(Image Source : Internet/ Representative)
नागपूर : मशिदींतील लाऊडस्पीकर हटवण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष आणि साकोलीतील पक्षाचे उमेदवार नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संविधानातील तरतुदी न पाळणाऱ्यांवर बोलणे व्यर्थ आहे.
ज्यांना घटनात्मक व्यवस्था मान्य नाही त्यांच्याबद्दल चर्चा न केलेलीच बरी. आपली राज्यघटना सांगते की प्रत्येकजण स्वतःचा धर्म पाळू शकतो आणि दुसऱ्याच्या धर्मावर आक्षेप घेऊ शकत नाही.
पण ज्यांना धर्माच्या आधारे समाजात फूट पाडायची आहे, ज्यांचा संविधानावर विश्वास नाही, त्यांच्याबद्दल न बोललेलेच बरे, असे पटोले म्हणाले.