तलवारबाजीत RTMNU च्या मंजिरी तांबेला कांस्यपदक

07 Nov 2024 19:25:08
Manjiri Tambe
 (Image Source : Internet)
 
नागपूर :
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची खेळाडू मंजिरी तांबे (Manjiri Tambe) हिने जम्मू विद्यापीठ जम्मू येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत फाईल या वैयक्तिक गटात कांस्यपदक प्राप्त केले आहे.
 
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धा जम्मू येथे ६ ते १० नोव्हेंबर दरम्यान जम्मू येथे होत आहे. या स्पर्धेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ संलग्नित भंडारा येथील जे. एम. पटेल कॉलेज मधील मंजिरी ही विद्यार्थिनी आहे.
 
भंडारा जिल्ह्यातील खेलो इंडिया तलवारबाजी प्रशिक्षण केंद्रात मंजिरी प्रशिक्षण घेत आहे. अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत वैयक्तिक गटात फाॅईल प्रकारात कांस्यपदक प्राप्त करणाऱ्या मंजिरीचे प्रभारी कुलगुरू डॉ. प्रशान्त बोकारे, प्रभारी प्र-कलुगुरू डॉ. राजेंद्र काकडे, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळ प्रभारी संचालक डॉ. विशाखा जोशी यांच्यासह सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0