(Image Source : Internet)
एबी न्यूज नेटवर्क :
अमेरिकेत झालेल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालावर आज सकाळपासून संपूर्ण जगाचे लक्ष लागून होते. ही प्रतीक्षा अखेरीक संपली असून डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठीची मतमोजणी अद्याप सुरू असून अमेरिकन मीडिया आउटलेट फॉक्स न्यूजने ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचा विजय घोषित केला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी 277 इलेक्टोरल मते मिळवून अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्याचे अमेरिकन मीडियाने जाहीर केले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिस्पर्धी कमला हॅरिस यांना केवळ 224 इलेक्टोरल मते मिळण्याची शक्यता होती. यामुळे ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे. त्यानंतर या विजयासह डोनाल्ड ट्रम्प यांनी पहिले विधान प्रसिद्ध करत सर्व अमेरिकनांचे आभार मानले आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील लढत खूपच रंजक होती. पण अमेरिकन जनतेने पुन्हा एकदा डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचंड बहुमताने निवडणूक जिंकली असून ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अमेरिकन मीडिया हाऊस फॉक्स न्यूजने ही निवडणूक डोनाल्ड ट्रम्प जिंकल्याची घोषणा केली आहे. ट्रम्प 4 वर्षांनंतर व्हाईट हाऊसमध्ये परतले आहेत. ट्रम्प 2017 ते 2021 पर्यंत राष्ट्राध्यक्ष होते. अशातच आता ट्रम्प यांच्या विजयामुळे रिपब्लिकन पक्षाच्या विजयाला अमेरिकन जनता कशी मानते, हे आता पाहावे लागणार आहे.
रिपब्लिकन पक्ष विजयी झाल्याच्या घोषणेनंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया त्यांच्या समर्थकांमध्ये त्यांना संबोधित करण्यासाठी पोहोचले. हा इतिहासातील सर्वात मोठा राजकीय क्षण असल्याचे सांगत त्यांनी आपल्या विजयी भाषणात हा माझा विजय नसून प्रत्येक अमेरिकनचा विजय असल्याचे म्हणत सर्व मतदारांचे आभार मानले. मतदारांना संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की. अमेरिका पुन्हा एकदा महान होणार आहे.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प म्हणतात, ही अशी चळवळ आहे जी यापूर्वी कोणीही पाहिली नाही. खरे सांगायचे तर माझ्या मते ही आजवरची सर्वात मोठी राजकीय चळवळ होती. या देशात आतापर्यंत असे काही घडले नाही आणि आणि कदाचित पुढेही घडणार नाही. आता, ते महत्त्वाच्या एका नवीन स्तरावर पोहोचणार आहे कारण आम्ही आमच्या देशाला चांगले करण्यास मदत करणार आहोत. आपला एक देश आहे ज्याला मदतीची गरज आहे. आम्ही आमच्या सीमा निश्चित करणार आहोत, आमच्या देशाबद्दल सर्वकाही निश्चित करणार आहोत. आज रात्री आम्ही एका कारणास्तव इतिहास घडवला आणि त्याचे कारण इतकेच आहे की, आम्ही अडथळ्यांवर मात केली जी कोणालाही शक्य वाटली नाही. हे स्पष्ट आहे की आम्ही सर्वात अविश्वसनीय राजकीय विजय मिळवला आहे.