(image source : internet/representative)
ए बी न्यूज नेटवर्क/तामिळनाडू :
सध्या अमेरिकेत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात चांगलीच लढत बघायला मिळत आहे. अशातच भारतातून देखील हॅरिस यांच्या विजयासाठी पूजा केली जात आहे. दक्षिण भारतातील तिरुवरूर जिल्ह्यातील थुलसेंद्रपुरम गावात कमला हॅरिसच्या विजयासाठी अनोखे आयोजन करण्यात आले आहे.
गावातील लोकांनी तमिळ संस्कृतीतील पारंपरिक 'कोलाम' डिझाईन्स तयार करून कमला हॅरिसच्या यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत."वनक्कम अमेरिका - कमला हॅरिस - वेट्रीपेरा वाझथुकल" अर्थात नमस्ते अमेरिका - कमला हॅरिस - तुझ्या विजयासाठी शुभेच्छा असे संदेश असलेली कोलाम काढण्यात आली.
थुलसेंद्रपुरम गाव हे कमला हॅरिसच्या वडिलांचा जन्मगाव आहे. आणि येथे तिच्या विजयासाठी शुभेच्छा देण्यासाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले. थुलसेंद्रपुरम येथील श्री धर्म संस्था श्री सेवक पेरुमाल मंदिरात कमला हॅरिसच्या विजयासाठी विशेष पूजा आयोजित करण्यात आली होती. या पूजेच्या कार्यक्रमात गावातील नागरिक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.