छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई अन् म.प्र.चे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची भेट

    05-Nov-2024
Total Views |
Vishnu Dev Sai and MP Chief Minister Dr Mohan Yadavs meeting(image source : internet) 
ए बी न्यूज नेटवर्क/रायपूर:
छत्तीसगड राज्य स्थापना दिवस आणि राज्योत्सव 2024 च्या निमित्ताने मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांची छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांची भेट घेतली.
 
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी छत्तीसगडच्या २५ व्या स्थापना दिनानिमित्त रायपूरमध्ये तीन दिवसीय 'राज्योत्सव' 2024 चे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी छत्तीसगड राज्याला शुभेच्छा दिल्या आणि राज्याने सदैव प्रगतीच्या मार्गावर चालावे, असे सांगितले. डॉ. यादव यांनी राज्याच्या नागरिकांच्या बदलत्या जीवनाचा उल्लेख केला आणि छत्तीसगडचा समृद्ध वारसा आणि संस्कृतीचा गौरव केला.
 
डॉ. यादव यांनी सोशल मीडिया पोस्टवर करीत लिहिले की, "छत्तीसगड मातेचा जयजयकार! समृद्ध वारसा आणि संस्कृतीची पवित्र भूमी असलेल्या छत्तीसगडच्या २५ व्या स्थापना दिनानिमित्त आज राजधानी रायपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राज्योत्सव कार्यक्रमात सहभागी होण्याचे सौभाग्य मला मिळाले. राज्याने सदैव प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करावी आणि नागरिकांच्या जीवनात सुखद बदलांचा प्रवास पुढे जावा." असे त्यांनी नमूद केले.
 
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत राज्याच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्यांनी म्हटले की, "आमचा छत्तीसगड असाच समृद्ध राहो, तुम्हा सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी येवो आणि तुम्हा सर्वांना ऐश्वर्य आणि समृद्धी लाभो, अशी मी माँ लक्ष्मी आणि गौरा-गौरींना प्रार्थना करतो." तसेच, राज्य सरकारने निवडणुकांदरम्यान दिलेली अनेक आश्वासने अवघ्या १० महिन्यांत पूर्ण केली असल्याचे त्यांनी उल्लेख केले.
 
राज्योत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री अरुण साव, भाजपचे प्रदेशाध्यक्ष किरण सिंह देव, कॅबिनेट मंत्री श्याम बिहारी जैस्वाल, खासदार ब्रिजमोहन अग्रवाल, आमदार मोतीलाल साहू, भाजपचे उमेदवार सुनील सोनी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात राज्य सरकारच्या कामकाजाची माहिती दिली आणि छत्तीसगडच्या प्रगतीबद्दल विचार मांडले गेले.
 
1 नोव्हेंबर 2000 रोजी मध्य प्रदेशापासून वेगळा होत छत्तीसगड राज्याची स्थापन करण्यात आली. त्या दिवसापासून प्रत्येक वर्षी छत्तीसगड स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदा रौप्य महोत्सवी वर्ष आहे. स्थापना दिनाच्या सोहळ्यात राज्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीवर लक्ष केंद्रित करण्यात आले.राज्य सरकारने या कार्यक्रमाद्वारे छत्तीसगडच्या  लोकांसाठी विविध विकास योजना आणि भविष्यकालीन प्रकल्पांचे खुलासे केले.