(image source : internet) अमेरिका :
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. प्राथमिक टप्प्यात डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन या दोन्ही पक्षांनी आयोवाकडे दुर्लक्ष केले होते, परंतु आता ते एक स्विंग स्टेट बनण्याची क्षमता दर्शवत आहे. एका ताज्या सर्वेक्षणानुसार, हॅरिस यांनी ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली आहे. डेस मोइनेस रजिस्टरच्या सर्वेक्षणानुसार, महिला आणि स्वतंत्र मतदारांच्या पाठिंब्यामुळे हॅरिस ४७ टक्के तर ट्रम्प ४४ टक्क्यांसह आघाडीवर आहेत.
दुसरीकडे, ट्रम्प यांनी या सर्वेक्षणाला बनावट ठरवत फेटाळले. ट्रम्प म्हणाले, 'माझ्या एका शत्रूने नुकतेच एक सर्वेक्षण प्रसिद्ध केले आहे आणि मी 3 टक्के मागे आहे. आयोवा सिनेटर जोनी अर्न्स्टने मला कॉल केला आणि सांगितले की तुम्ही आयोवामध्ये हरत आहात. हे सर्व खोटे आहे, कारण शेतकरी माझ्यावर प्रेम करतात आणि मी त्यांच्यावर प्रेम करतो, असे ते म्हणाले.
आयोवावर कोणाचेही लक्ष नव्हते, असे सांगण्यात आले आहे. 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीपूर्वी आयोवा हे प्रमुख निवडणूक राज्य नव्हते. दोन्ही उमेदवारांनी येथे लक्ष केंद्रित केले नाही. यामध्ये अरिझोना, जॉर्जिया, मिशिगन, नेवाडा, नॉर्थ कॅरोलिना, पेनसिल्व्हेनिया आणि विस्कॉन्सिन यासारखी सात राज्ये समाविष्ट आहेत. या राज्यांत ट्रम्प आणि हॅरिस यांनी निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला.
विशेष म्हणजे, गेल्या दोन निवडणुकांमध्ये ट्रम्प यांनी आयोवामध्ये जवळपास 10 टक्के विजय मिळवला होता. तथापि, यामुळे आयोवा रिपब्लिकनचा बालेकिल्ला बनत नाही, कारण बराक ओबामा यांनी 2008 आणि 2012 मध्ये येथे विजय मिळवला होता. दरम्यान, या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.