आदमपूर येथून उड्डाण घेतलेले मिग-२९ लढाऊ विमान आग्राजवळ कोसळले

04 Nov 2024 20:47:50
A MiG 29 fighter jet crashed near Agra(image source : internet/representative) 
पंजाब :
पंजाबच्या आदमपूर येथून उड्डाण घेतलेले मिग-२९ लढाऊ विमान सोमवारी दुपारी उत्तर प्रदेशातील आग्रा जवळ कोसळल्याची घडली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानाचे वैमानिक सुरक्षितपणे बाहेर पडले आहेत. हे विमान आग्राला सरावासाठी जात होते.
 
संरक्षण अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, 'एक मिग-२९ लढाऊ विमान आग्रा, उत्तर प्रदेशजवळ कोसळले आहे. वैमानिक विमानातून बाहेर पडला आहे. अधिक तपशीलांची प्रतीक्षा असून आणि कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश दिले जातील,' असे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे स्थानिक प्रशासन आणि संरक्षण विभागाचे तज्ञ घटनास्थळी पोहोचले आहेत. अधिक माहिती उपलब्ध होताच पुढील कारवाई करण्यात येईल.
Powered By Sangraha 9.0