(image source : internet/representative) चेन्नई :
चेन्नईच्या अमजीकराई येथे 15 वर्षीय मुलीवर अत्याचार आणि मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तंजावर येथील रहिवाशी असलेल्या या मुलीचा गेल्या तीन महिन्यांपासून सहा लोकांकडून छळ सुरू होता आणि शेवटी 31 ऑक्टोबर रोजी तिची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मुलगी डिसेंबर 2023 पासून मोहम्मद निशाद या व्यक्तीच्या बाळाची काळजी घेत होती. आरोपींमध्ये मोहम्मद निशाद (30), निवेथा उर्फ नसिया (30), लोकेश (25), जया शक्ती (24), सीमा (39), आणि माहेश्वरी (40) यांचा समावेश आहे.
एक नोव्हेंबर रोजी मिळालेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी संशयास्पद मृत्यूच्या कलमाखाली गुन्हा नोंदवला आहे. तपासात मुलीच्या शरीरावर भाजलेल्या जखमांसह इतर अनेक जखमा आढळल्या आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपींनी मुलीवर अनेकदा अत्याचार केले आणि 31 ऑक्टोबर रोजी झालेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.
सर्व सहा आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तसेच याप्रकरणी योग्य कारवाईची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.