ठाकरे गटाला स्वतंत्र निवडणुकीची मागणी; महाविकास आघाडीत फूट?

    28-Nov-2024
Total Views |
Thackeray group demands separate elections
 (Image Source : ABP Majha)
मुंबई :
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने ऐतिहासिक विजय मिळवत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. महायुतीने बहुतेक जागांवर विजय मिळवून सत्ता कायम राखली, तर महाविकास आघाडीच्या पराभवाने ठाकरे गटासह काँग्रेस-राष्ट्रवादीवरही दबाव वाढला आहे. ठाकरे गटासाठी विधानसभा निवडणूक निराशाजनक ठरली. 95 पैकी केवळ 20 जागांवर विजय मिळवणाऱ्या ठाकरे गटाला मुंबई महापालिका निवडणुकीसाठी नव्या रणनीतीची गरज आहे. पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना स्थानिक स्वराज्य संस्था आणि महानगरपालिका निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची मागणी केली आहे.
 
पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षाच्या युतीऐवजी स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची मागणी केल्याने ठाकरे गटाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. महापालिकेच्या सर्व 227 जागा लढवण्याची ताकद आपल्याकडे आहे, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी मांडली आहे. यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले, निकालानंतर चिंतन आणि मंथन होणं स्वाभाविक आहे. काही कार्यकर्त्यांची स्वतंत्र लढण्याची मागणी आहे, पण राजकीय निर्णय घाईत घेतले जात नाहीत. महापालिका निवडणुकांसाठी योग्य निर्णय घेतला जाईल. आता ठाकरे गट महाविकास आघाडीतून बाहेर पडणार की 'एकला चलो रे'ची भूमिका घेणार, याकडे संर्वांचे लक्ष लागले आहे.