Govardhan Puja 2024 : ...म्हणून श्रीकृष्णाने करंगळीवर उचलला होता गोवर्धन पर्वत

    02-Nov-2024
Total Views |

Lord Krishna lifted Govardhan mountain on his little finger
(Image Source : Internet/ Representative)

नागपूर :
दिवाळीच्या चौथ्या दिवशी बऱ्याच ठिकाणी गोवर्धन पूजा केली जाते. तर काही ठिकाणी अन्नकूट पूजा केली जाते. भारतातील विभिन्नतेमुळे प्रत्येक सण साजरा करण्याच्या पद्धतीही वेगवेगळ्या आहेत. गोवर्धन पूजेला लोक शेणाचा वापर करतात. साधारणपणे हा सण लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. यंदा दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवार २ नोव्हेंबर रोजी गोवर्धन पूजा केली जाणार आहे.
 
गोवर्धन पूजेच्या दिवशी भारतातील काही भागात शेणाचे पर्वत बनवून त्याची पूजा केली जाते. तसेच भगवान श्रीकृष्णाला अन्नकूट अर्पण केले जाते. आजच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाला ५६ भोग लावण्याला विशेष महत्व असते. एका पौराणिक कथेनुसार, भगवान इंद्राने रंगाच्या आणि अहंकाराच्या आहारी जाऊन वृंदावन नगरीत खूप जास्त पाऊस पडला. तेव्हा नगरवासींना आणि जनावरांना या पावसापासून वाचवण्यासाठी भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलून संपूर्ण वृंदावन नगरीतील रहिवास्यांना पावसापासून वाचविले होते. म्हणून आजच्या दिवशी गोवर्धन पर्वताचे प्रतीक म्हणून शेणाचे पर्वत बनवून त्याची पूजा केली जाते.
 

Govardhan Puja 2024 
 
गोवर्धन पूजेची तारीख आणि वेळ
पंचांगानुसार, कार्तिक मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी 1 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 06.16 पासून सुरू होईल. त्याचवेळी, 2 नोव्हेंबर रोजी रात्री 8:21 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत गोवर्धन पूजेचा उत्सव 2 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पूजा करण्याचा शुभ मुहूर्त पुढीलप्रमाणे आहे.
 
सकाळचा मुहूर्त -  6:34 ते 8:46 पर्यंत.
विजय मुहूर्त - दुपारी 2:09 ते 2:56 पर्यंत पुन्हा दुपारी 3:23 ते 5:35 पर्यंत.
संध्याकाळची वेळ - संध्याकाळी 6:05 ते 6:30 पर्यंत.
त्रिपुष्कर योग - 3 नोव्हेंबर रोजी रात्री 8:21 ते पहाटे 5:58 पर्यंत
 
 
 
Disclaimer : या लेखातील माहितीची आणि कथांच्या अचूकतेची किंवा विश्वासार्हतेची हमी दिलेली नाही. ही माहिती विविध माध्यमांतून/ पौराणिक कथा/ शास्त्रानुसार एकत्रित करून तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे. आमचा उद्देश केवळ माहिती प्रसारित करणे असून वाचकाने ती केवळ माहिती म्हणून घ्यावी.