इंस्टाग्रामची सेवा ठप्प; हजारो वापरकर्त्यांना लॉग इनमध्ये अडचणी

    08-Oct-2024
Total Views |
Instagram service down  (Image Source : Internet)
एबी न्यूज नेटवर्क :
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामची सेवा ठप्प झाली आहे. अचानक ॲप्लिकेशन डाऊन झाल्यामुळे अनेक वापरकर्त्यांना इंस्टाग्राम वापरण्यात समस्या येत आहेत. डाउनडिटेक्टर या आउटेज तपासणाऱ्या वेबसाइटवर सुमारे एक हजार युजर्सनी इन्स्टाग्राम डाऊन झाल्याची तक्रार नोंदवली आहे.
 
डाउनडिटेक्टरवर दिसणाऱ्या रिपोर्टनुसार, इंस्टाग्राम सकाळी 10.45 वाजल्यापासून डाउन आहे. सकाळी 10.45 वाजेपर्यंत 30 पेक्षा कमी लोकांनी तक्रार केली होती, परंतु 11.30 वाजेपर्यंत 1900 हून अधिक लोकांनी इन्स्टाग्राम वापरता येत नसल्याची तक्रार नोंदवली. याशिवाय लोकांनी मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X वर देखील याबाबत माहिती दिली आणि इंस्टाग्राम वापरण्यास अडचण येत असल्याची तक्रार केली आहे.
 
इंस्टाग्रामची लोकप्रियता भारतातसह संपूर्ण जगभरात आहे. भारतात ही ॲप वापरणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. याच कारणामुळे इन्स्टाग्रामची सेवा काही सेकंदांसाठी बंद पडली तर सोशल मीडियावर एकच गोंधळ सुरू होतो. मात्र, आजच्या आउटेजबाबत इन्स्टाग्रामची मूळ कंपनी मेटाकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तथापि, सोशल मीडियावरील लोकांनी इंस्टाग्राम डाउन असल्याचा पुरावा म्हणून स्क्रीनशॉट शेअर करत सांगितले की, इन्स्टा उघडताना, सॉरी, समथिंग वेंट राँग लिहिले होते.