'आखाता'तील संघर्ष वाढणार

    08-Oct-2024
Total Views |
Israel Iran attack
(Image Source : Internet/ Representative)

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यातच हमासने इस्राईलवर हल्ला करून इस्राईलचे १२०० हून अधिक नागरिकांची हत्या करून २५१ नागरिकांचे अपहरण केले होते. हमासच्या या हल्ल्याला प्रतिउत्तर म्हणून इस्राईलने गाझा पट्टीवर हल्ला करून गाझा पट्टी अक्षरशः जमीनदोस्त केली. इस्राईलने केलेल्या हल्ल्यात ४२ हजारांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला असून हमासचे १२ हजारांहून अधिक दहशतवादी ठार झाले आहेत. इस्राईल - हमास युद्धाला आज एक वर्ष पूर्ण झाला, तरीही त्यांच्यातील संघर्ष संपलेला नाही.

इस्राईल - हमास युद्धाला एक वर्ष पूर्ण होत असतानाच इस्राईलने लेबनॉनवर हल्ला केला. इस्राईलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यात लेबनॉनमधील हिजाबुल्ला या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेल्या हसन नसराल्ला हा ठार झाला. त्या अगोदर इस्राईलने लेबनॉनवर पेजर आणि वोकिटॉकी हल्ला केला होता. इस्राईलने लेबनॉनवर हल्ला करण्यामागचे कारण म्हणजे लेबनॉन हमासला करीत असलेले आर्थिक आणि लष्करी सहाय्य. लेबनॉनमधील हिजबुल्ले इस्राईल - हमास युद्धात हमासला आर्थिक आणि लष्करी सहाय्य पुरवत होते. इतकेच नाही तर काही हिजबुल्ले प्रत्यक्ष युद्धातही सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी इस्राईलने लेबनॉनवर हल्ला करून हीजबुल्लाना लक्ष केले.

इस्राईल - हमास नंतर इस्राईल - लेबनॉन संघर्षाने जग चिंतेत पडले असतानाच या संघर्षात इराणने उडी घेऊन संघर्षाची व्याप्ती आणखी वाढवली. फक्त संघर्षाची व्याप्ती वाढवली नाही, तर जगाची चिंताही वाढवली कारण इराण हा अरब देशातील किंबहुना इस्लामिक देशातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा देश आहे. इस्राईल हमास युद्धात इराणने अपेक्षित उडी घेतल्याने हा संघर्ष आणखी वाढणार हे स्पष्ट झाले.

इस्राईल हमास युद्धात इराणने अपेक्षित उडी घेतली असा उल्लेख मी वर केला आहे, त्याचे कारण इराण या युद्धात उडी घेईल असा अंदाज गेला वर्षभर लावला जात होता. कारण इस्राईल - इराण संघर्ष जगाला नवीन नाही. या आधीही या दोन देशात युद्धाचा भडका उडाला आहे. १९८० सालच्या दशकात तर दोन देशात कायम युद्धाच्या ठिणग्या पडत होत्या. त्यामुळे या युद्धात इराण केव्हाही उडी घेईल, असे म्हटले जात होते ते खरे ठरवत इराणने इस्राईलवर हल्ला करीत २०० हून अधिक क्षेपणास्त्रे डागली. अर्थात इस्राईलने या हल्ल्याचा यशस्वी बचाव केला. यात इस्राईलची म्हणावी तशी हानी झाली नसली, तरी या हल्ल्याचा बदला घेतला जाईल असा इशारा इस्राईलने दिला आहे. याचाच अर्थ आगामी काळात इस्राईलकडून इराणवर हल्ला करण्यात येईल आणि जर तसे झाले तर हे युद्ध आणखी वाढू शकेल त्यात अमेरिकेने नेहमीप्रमाणे यात नाक खुपसले आणि इस्राईल पाठिंबा दिला.

अमेरिकेने इस्राईलला पाठिंबा दिल्याने इराण आणखी खवळला कारण इराण इस्राईल प्रमाणे अमेरिकेलाही आपला शत्रू मानतो. अमेरिकेत सध्या निवडणुकीची लगबग चालू आहे. या निवडणुकीत राष्ट्राध्यक्ष पदासाठी उभे असलेले डोनाल्ड ट्रम्प यांनी तर इस्राईलला चिथावणी देत म्हटले आहे की इस्राईलने इराणच्या आण्विक तळावर आणि तेलाच्या विहिरींवर हल्ला करावा. जर मी म्हणजे ट्रम्प जिंकून आलो तर इस्राईलच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून इराणला त्यांची जागा दाखवून देईल. उद्या जर डोनाल्ड ट्रम्प खरेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले तर हा संघर्ष आणखी वाढेल.

अमेरिकेने आजवर प्रत्यक्ष युद्धात उतरून इस्राईलला साथ दिलेली नाही मात्र डोनाल्ड ट्रम्प जर निवडून आले तर ते इस्राईलच्या बाजूने प्रत्यक्ष मैदानात उतरू शकतात आणि जर तसे झाले तर आजवर या युद्धात तटस्थ राहिलेले इजिप्त, जॉर्डन, सीरिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती हे अरब राष्ट्रे इराण ला साथ देण्यासाठी मैदानात उतरील आणि जर तसे झाले तर ती तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात ठरेल म्हणूनच हा संघर्ष आणखी वाढू न देण्याची खबरदारी जगाने घ्यावी.



श्याम बसप्पा ठाणेदार
दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५



*Disclaimer : ब्लॉग हे स्वतंत्र व्यासपीठ आहे. त्यामुळे यात मांडले गेलेले विचार हे लेखकाचे आहेत.