वाडी नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे लोकार्पण

07 Oct 2024 21:22:43
- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकापर्ण; नागरिकांत आनंदी आनंद

Wadi Nagar Parishad 
वाडी:
वाडी नगर परिषदच्या (Wadi Nagar Parishad) प्रशासकीय इमारतीचे लोकापर्ण केंद्रीय मंत्री (रस्ते व वाहतूक ) नितीन गडकरी यांच्या हस्ते खासदार श्यामकुमार बर्वे, आमदार समीर मेघे, आमदार टेकचंद सावरकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, अरविंद गजभिये यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवार ५ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता करण्यात आले. प्रशस्त इमारतीच्या बांधकामावर ८ कोटी रुपये खर्च झाले असुन आमदार समीर मेघे यांच्या प्रयत्नामुळे हि सुंदर प्रशासकीय इमारत वाडी नगर परिषदला मिळाल्याने नागरिकांनी सांगितले. या इमारतीच्या उद्घाटनाची वाट बऱ्याच दिवसांपासून नागरिक पहात होते. ती पूर्ण झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
 
यावेळी युवासेनेचे केंद्रीय समिती सदस्य व माजी सभापती हर्षल काकडे, माजी नगराध्यक्ष प्रेम झाडे, माजी उपनगराध्यक्ष नरेश चरडे, माजी नगरसेवक राजेश जैस्वाल, केशव बांदरे,दिनेश कोचे,श्याम मंडपे, नरेंद्र मेंढे, कैलाश मंथापूरवार, आशिष नंदागवळी, संतोष केचे, रुपेश झाडे, मधु मानके पाटील, शैलेश थोराणे, विजय मिश्रा, आनंदबाबू कदम, गोविंदराव रोडे, कमल कनोजे,मोहन ठाकरे, सुरेंद्र मोरे,अमित हुसनापुरे, प्रमिला पवार , मालती शिंदे, आदी नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक व पाहूण्याचे स्वागत मुख्याधिकारी डॉ. विजय देशमुख यांनी केले. संचालन वरिष्ठ लिपिक योगेश जहागीरदार यांनी तर आभार उपमुख्याधिकारी गौरव गाडगे यांनी मानले. आयोजनासाठी वाडी नगर परिषदचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कर्मचारी आदींनी सहकार्य केले.
Powered By Sangraha 9.0