तब्बल २७ वर्षांनी मुंबईने जिंकला इराणी चषक

05 Oct 2024 18:33:10

Mumbai won Irani Cup after 27 years
(Image Source : x/@BCCIdomestic)
 
एबी न्यूज नेटवर्क :
सर्वाधिक रणजी ट्रॉफी आपल्या नवी करणाऱ्या मुंबईने आता इराणी चषक वर नाव कोरले आहे. तब्बल २७ वर्षांनी मुंबई संघाने चमकदार कामगिरी करीत इराणी चषकावर कब्जा केला. शेष भारत विरुद्ध मुंबई असा सुरु असलेल्या सामना अनिर्णित ठरल्याने मुंबईकडे पहिल्या डावात आघाडी असल्याने मुंबईला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले.
 
 
 
इराणी चषक हा सहसा रणजी चॅम्पियन आणि शेष भारत यांच्यातील पाच दिवसांचा सामना असतो. मुंबईने शेवटचा इराणी चषक १९९७-९८ मध्ये जिंकला होता. मुंबई आठ वेळा रणजी चॅम्पियन बनली, पण आठपैकी इराणी चषक जिंकू शकली नाही. मात्र, यावेळी विशेषतः फलंदाज सर्फराज खान (नाबाद 222 आणि 17 धावा), कर्णधार अजिंक्य रहाणे (97 धावा आणि 9 धावा), तनुष कोटियन (64 धावा, नाबाद 114, 101 धावांत तीन बळी) तसेच शम्स मुल्लानी, मोहित अवस्थी, आदी गोलंदाजांच्या कामगिरीच्या जोरावर मुंबईने इराणी चषक जिंकण्यात यश मिळविले.
 
मुंबईने पहिल्या डावात 537 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तर देताना शेष भारताने अभिमन्यू ईश्वरनच्या 191 धावा आणि यष्टीरक्षक ध्रुव जुरेलच्या 93 धावांच्या जोरावर 416 धावा केल्या. मुंबईने 121 धावांची आघाडी घेत अखेर दीड दशकानंतर पुन्हा इराणी चषक जिंकला.
 
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे (एमसीए) अध्यक्ष अजिंक्य नाईक यांनी इराणी चषक जिंकल्याबद्दल मुंबई संघाचे अभिनंदन आणि कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0