(Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क:
दिवाळीच्या सणाला अवघे काही तास उरले आहेत आणि या दिवाळीच्या सणात सुंदर दिसण्याची प्रत्येकाची इच्छा असते. कामाच्या गडबडीत आपण अनेकदा आपल्या चेहऱ्याकडे लक्ष देणे विसरतो. जर तुम्हाला चेहऱ्यावर झटपट ग्लो हवा असेल तर इन्स्टंट ग्लो फेस मास्क उपयोगी ठरू शकतात.
इन्स्टंट ग्लो फेस मास्कचे प्रकार:
केळी आणि ओट्स मास्क:
(Image Source : Internet/ Representative)
1 पिकलेले केळ, 2 चमचे ओट्स एकत्र करून पेस्ट तयार करा आणि 20-30 मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवा. नंतर पाण्याने धुवा. ओट्सचे जाडे भरडे पीठ हे बीटा-ग्लुकन्सने समृद्ध असलेले एक नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, जे तुमच्या त्वचेतील हायड्रेशन वाढवते आणि त्वचा मऊ आणि कोमल बनवते.
दही आणि लिंबू मास्क:
(Image Source : Internet/ Representative)
2 चमचे दही, 1 चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि 10-15 मिनिटांनी धुवा. दह्यामध्ये असलेले फॅट त्वचेला आर्द्रता देतात, ज्यामुळे कोरड्या त्वचेची समस्या कमी होऊ शकते. तर लिंबू त्वचेवर चमक आणण्यास उपयुक्त ठरते.
टोमॅटो आणि हनी मास्क:
(Image Source : Internet/ Representative)
1 टोमॅटो (मॅश केलेले), 1 चमचा मध हे एकत्र करून 10 मिनिटे चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर धुवून टाका. स्वच्छ आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी टोमॅटो हा सर्वात प्रभावी उपाय आहे.
एलोवेरा जेल आणि लिंबाचा रस:
(Image Source : Internet/ Representative)
2 टेबलस्पून एलोवेरा जेल, 1 चमचा लिंबाचा रस एकत्र करून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटांनी धुवा. कोरफड हा बऱ्याच काळापासून स्किनकेअर जगतात महत्वाची भूमिका बजावत आहे. चेहऱ्यावर कोरफडचा गर लावल्याने चेहरा सॉफ्ट आणि चमकदार बनतो.
बेसन, लिंबाचा रस आणि हळद मास्क:
(Image Source : Internet/ Representative)
2 चमचे बेसन, 1 चमचा लिंबाचा रस, 1/4 चमचा हळद आणि थोडे पाणी घेऊन पेस्ट तयार करून 10-15 मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवावे. या मास्कमुळे तुम्हाला दिवाळीच्या सणासाठी झटपट चमक मिळेल. हळद ही घरगुती आणि गुणकारी औषधांपैकी एक महत्त्वपूर्ण घटक आहे. हळद आपल्या आरोग्यासह चेहऱ्यासाठीही नैसर्गिक ग्लोईंग घटक आहे.