(Image Source : Internet/ Representative)
छत्तीसगड :
छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात एका 35 वर्षीय व्यक्तीची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिनेश पुजार असे मृत व्यक्तीचे नाव असून तो बासागुडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुटकेल या गावचा रहिवासी होता. नक्षलवाद्यांनी त्याच्यावर पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून धारदार शस्त्राने हल्ला केला.
पोलिसांना घटनास्थळी नक्षलवाद्यांनी जारी केलेले पत्रक मिळाले. या पत्रकात दिनेश पुजार हा पोलिसांचा खबरी असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना 29 ऑक्टोबर रोजी रात्री घडली. याआधी 19 ऑक्टोबरला नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटात दोन आयटीबीपी जवानांचा मृत्यू झाला, तर नारायणपूर जिल्ह्यातील दोन पोलीस जवान जखमी झाले होते. दंतेवाडा-नारायणपूर सीमेजवळील अबुझमदच्या जंगलात अलीकडे झालेल्या चकमकीत 38 नक्षलवादी मारले गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.