शुभवार्ता; धनत्रयोदशीला सोनं झालं स्वस्त,10 ग्रॅम सोन्यासाठी इतके रुपये मोजावे लागणार

    29-Oct-2024
Total Views |
Gold has become cheap on dhantrayodashi(Image Source : Internet/ Representative)
नागपूर :
देशभरात दिवाळी सणाचा उत्साह आहे. दिवाळी हा सण पाच दिवस साजरा केला जातो. आज धनत्रयोदशी असून आजच्या दिवशी सोनं खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. आज ग्राहकांची सराफा बाजारात प्रचंड गर्दी असते. त्यानिमित्ताने शुभवार्ता समोर आली आहे.
 
इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA) आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 72,188 रुपये आहे. तर, 24 कॅरेटसाठी तुम्हाला 78,750 रुपये मोजावे लागतील. तसेच, 1 किलो चांदीची किंमत ही आज 97 हजार 650 रुपये प्रती किलो आहे.
 
नागपुरातील सोन्याचे दर:
 
नागपूर : 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 72,059 रुपये तर, 24 कॅरेट सोनं 78,610 प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई : 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 72,059 रुपये तर, 24 कॅरेट सोनं 78,610 प्रति 10 ग्रॅम आहे.
पुणे : 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 72,059 रुपये तर, 24 कॅरेट सोनं 78,610 प्रति 10 ग्रॅम आहे.
नाशिक : 22 कॅरेट सोनं प्रति 10 ग्रॅम 72,059 रुपये तर, 24 कॅरेट सोनं 78,610 प्रति 10 ग्रॅम आहे.