Diwali Special : दिवाळीत तुमच्या लुकला आकर्षक बनवण्यासाठी खास फॅशन टिप्स

    28-Oct-2024
Total Views |
Diwali Special fashion tips
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
दिव्यांचा सण जवळ आला आहे आणि दिवाळी साजरी करण्यासाठी सर्वजण उत्सुक झाले आहेत. या दिवाळीला नवीन काय परिधान करायचे, याचा विचार सर्वांना पडला आहे. पारंपारिक सलवार सूट पासून ते आकर्षक साड्यांपर्यंत अनेक पारंपरिक आऊटफिट पर्याय असतात. दिवाळी म्हणजे आनंद, साजशृंगार आणि उत्सवाचा सण. या सणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या फॅशनमध्ये थोडा वेगळेपणा आणणे आवश्यक आहे. म्हणूनच, तुमचा संपूर्ण देखावा अधिक आकर्षक दिसण्यासाठी काही फॅशन टिप्स जाणून घ्या.
 
पँट आणि दुपट्ट्यासह ए-लाइन कुर्ता सेट

Diwali Special fashion tips
  (Image Source : Internet/ Representative)
 
पँट आणि दुपट्ट्यासह ए-लाइन कुर्ती हा एक आधुनिक आणि आरामदायक (Comfortable) पोशाख आहे. या कुर्तीच्या ए-लाइन डिझाइनमुळे ती अधिक आकर्षक दिसते, आणि दुपट्टा या लुकला एक विशेष स्पर्श देतो. खास प्रसंगांसाठी किंवा रोजच्या वापरासाठीदेखील हा पोशाख उत्तम आहे. लिबास कुर्ता सेट म्हणजे एक स्टाइलिश आणि आरामदायक पोशाख. या सेटमध्ये आकर्षक डिझाइन आणि विविध रंगांचा समावेश असतो, जो प्रत्येक प्रसंगासाठी योग्य ठरतो. पारंपरिक आणि आधुनिकतेचा संगम असलेल्या या कुर्ता सेटने तुमच्या फॅशनला नवीन लुक मिळेल.
 
कांजीवरम बनारसी सिल्क साडी

Diwali Special fashion tips
  (Image Source : Internet/ Representative)
 
कांजीवरम बनारसी सिल्क साडी एक विशेष भारतीय परंपरेचा महत्त्वाचा भाग आहे. या साडीमध्ये समृद्ध रंग, जटिल नक्षीकाम आणि आकर्षक बॉर्डर असते, ज्यामुळे ती खास प्रसंगांसाठी अत्यंत आकर्षक ठरते. तुम्ही दिवाळी 2024 साठी साडी घालण्याचा विचार करत असाल, तर ही सुंदर कांजीवरम सिल्क साडी या सणासाठी योग्य पर्याय आहे.
 
पैठणी लेहंगा

Diwali Special fashion tips
  (Image Source : Internet/ Representative)
 
पैठणी लेहंगा म्हणजे पारंपरिक आणि भव्यता यांचे उत्तम मिश्रण. या लेहंग्यात आकर्षक रंग, अद्वितीय नक्षीकाम आणि शुद्ध पैठणीच्या रेशमाचा वापर केला जातो. खास सणामध्ये घालण्यासाठी हा पोशाख एकदम योग्य आहे. दिवाळीच्या सणाला साजेसा हा पोशाख असतो, कारण त्यात समृद्धता, सांस्कृतिक महत्त्व, आणि सौंदर्य यांचा उत्तम संगम आहे. पैठणी महाराष्ट्रातील शाही व ऐतिहासिक वारसा दर्शविते. हा पोशाख पारंपरिक कलेचे प्रतीक आहे आणि त्याला एक विशेष महत्त्व आहे. दिवाळीत पैठणी लेहंगा परिधान केल्याने तुम्हाला सणाच्या आनंदात एक वेगळाच उत्साह वाटेल.
 
बलून स्लीव्ह कुर्ता :

Diwali Special fashion tips
  (Image Source : Internet/ Representative)
 
 बलून स्लीव्ह कुर्ता हा आधुनिक फॅशनचा एक आकर्षक पर्याय आहे. या कुर्त्यामध्ये बॅलून स्लीव्हसह वेगवेगळ्या प्रकारची डिझाइन असते, जी तुमचे लूक अधिक खुलून आणण्यास मदत करते. विविध रंग आणि नक्षीकाम केलेल्या बाजारात उपलब्ध या कुर्त्याने तुम्ही दिवाळी किंवा अन्य खास प्रसंगांमध्ये सुंदर लुक प्राप्त करू शकता.
 
रंगांची निवड:
 
दिवाळीला उजळ व आनंदी रंग जसे की लाल, गुलाबी, पिवळा, निळा आणि हिरवा वापरणे उत्तम ठरते. सोनेरी किंवा चांदीचा टच असलेले कपडेदेखील खास वाटतात.