अभिनेता पृथ्वीक प्रतापने केले साधेपणाने लग्न; कारण ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल

26 Oct 2024 12:32:30
Prithvik Pratap got married
 (Image Source : Internet/ Representative)
एबी न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्राची हास्य जत्रा अभिनेता पृथ्वीक प्रताप ने अगदी साधेपणाने कौटुंबिक सोहळ्यात लग्न केले. पृथ्वीक ने प्रियसी प्राजक्ता वायकुळ सोबत अगदी साधेपणाने लग्नगाठ बांधून घेतली. कुठलाही गाजावाजा न करत अगदी कौटुंबिक वातावरणात हा विवाह सोहळा पार पडला. इतक्या साधेपणाने विवाह सोहळा पार पाडल्याचे कारण पृथ्वीक ने सांगितले. हे कारण ऐकून आपल्यालाही अभिमानच वाटेल.
 
महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या पृथ्वीक प्रतापने आपल्या अनोखे शैलीतून प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. प्रेक्षकांना हसवता हसवता अनेकदा पृथ्वीकने त्यांचे प्रबोधन देखील केले आहे. अशा त्याने कोणताही मोठा खर्च न करता अगदी साधेपणाने लग्न सोहळा पार पाडला यावेळी कुटुंबातील काही जण आणि मित्रमंडळी सोबत होते.
 
असे आहे कारणं
 
पृथ्वीक ने अगदी साधेपणाने लग्न केल्याबाबत सांगितले की आमच आधीपासूनच ठरलं होतं. दोघांनीही विवाह सोहळ्यात अवाढव्य खर्च न करता एक सामाजिक कार्य करण्याचे ठरविले आहे आम्ही दोन मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी घेत आहोत आमच्या लग्नाचा खर्च आम्ही या मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार आहोत अशाने कोणाचे तरी आयुष्य सुंदर बनव ण्यात मदत होईल अशी आशा आणि याचा आनंद देखील मला आहे असे पृथ्वीकने सांगितले.
Powered By Sangraha 9.0