55 व्या IFFI मध्ये इंडियन पॅनोरमा अंतर्गत प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची यादी जाहीर

25 Oct 2024 13:59:13

Films to be screened at IFFI
 
 
 
मुंबई :
इफ्फी (IFFI), अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा मुख्य भाग असलेल्या इंडियन पॅनोरमाने 55 व्या इफ्फी मध्ये प्रदर्शित करण्यासाठी निवड झालेल्या 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन-फिचर फिल्म्सची (माहितीपट) यादी जाहीर केली. एकूण 384 समकालीन भारतीय चित्रपटांच्या विस्तृत श्रेणीतून, सिनेमाच्या मुख्य प्रवाहातील 5 चित्रपटांसह 25 चित्रपटांचा संच निवडण्यात आला आहे. भारतीय पॅनोरमा 2024 चा उद्घाटनपर चित्रपट म्हणून निवड समितीने रणदीप हुडा दिग्दर्शित 'स्वातंत्र्य वीर सावरकर (हिंदी)' या चित्रपटाची निवड केली आहे. याशिवाय, इंडियन पॅनोरामामध्ये 262 चित्रपटांच्या श्रेणीतून निवडलेल्या 20 नॉन-फीचर फिल्म्स प्रदर्शित केल्या जातील.
 
नॉन-फीचर फिल्म्सचे पॅकेज (संच), नवोदित आणि प्रस्थापित चित्रपट निर्मात्यांच्या दस्तऐवजीकरण, तपास, मनोरंजन आणि समकालीन भारतीय मूल्ये प्रतिबिंबित करण्याच्या क्षमतेचा प्रत्यय देतील. नॉन-फिचर श्रेणीतील उद्घाटनपर चित्रपट म्हणून, ज्युरींनी हर्ष संगानी दिग्दर्शित ‘घर जैसा कुछ (लडाखी)’ या चित्रपटाची निवड केली आहे.
 
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता आणि पटकथा लेखक डॉ. चंद्र प्रकाश द्विवेदी यांनी फीचर फिल्म निवड समितीचे नेतृत्व केले. ज्युरीमध्ये बारा सदस्य असून, ते वैयक्तिकरित्या विविध दर्जेदार चित्रपटांचे प्रतिनिधित्व करतात आणि ख्यातनाम चित्रपट व्यावसायिक आहेत, तसेच ते एकत्रितपणे वैविध्यपूर्ण भारतीय चित्रपट सृष्टीचे प्रतिनिधित्व करतात.
  
इंडियन पॅनोरमा फीचर फिल्म्स ज्युरी सदस्य:
 
1. मनोज जोशी, अभिनेते
2. सुस्मिता मुखर्जी, अभिनेत्री
3. हिमांशू शेखर खटुआ, चित्रपट दिग्दर्शक
4. ओयनम गौतम सिंग, चित्रपट दिग्दर्शक
5. आशु त्रिखा, चित्रपट दिग्दर्शक
6. एस.एम. पाटील, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक
7. नीलभ कौल, सिनेमॅटोग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शक
8. सुशांत मिश्रा, चित्रपट दिग्दर्शक
9. अरुण कुमार बोस, प्रसाद संस्थेचे माजी एचओडी आणि ध्वनी अभियंता
10. रत्नोत्तमा सेनगुप्ता, लेखिका आणि संपादक
11. समीर हंचाटे, चित्रपट दिग्दर्शक
12. प्रिया कृष्णस्वामी, चित्रपट दिग्दर्शक
 
इंडियन पॅनोरमा 2024 साठी निवड झालेले 25 फीचर चित्रपट:
 
1. स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदी, रणदीप हुडा
2. केरेबेटे, कन्नड, गुरुराज बी
3. वेंक्या, कन्नड, सागर पुराणिक
4. जुईफूल, आसामी, जादूमोनी दत्ता
5. महावतार नरसिम्हा, हिंदी, अश्विन कुमार
6. जिगरथंडा डबल एक्स, तमिळ, कार्तिक सुब्बाराज
7. आदुजीवितम्, VIAȚA CAPREI, The GOATLIFE), मल्याळम, ब्लेसी
8. आर्टिकल 370, हिंदी, आदित्य सुहास जांभळे
9. जिप्सी (GYPSY) मराठी, शशी चंद्रकांत खंदारे
10. श्रीकांत, हिंदी, तुषार हिरानंदानी
11. आमार बॉस, बंगाली, नंदिता रॉय,शिबोप्रसाद मुखर्जी
12. ब्रम्हयुगम (BRAMAYUGAM), मल्याळम, राहुल सदाशिवन
13. 35 चिन्ना कथा काडू, तेलुगु, नंदा किशोर इमानी
14. राडोर पाखी, आसामी, डॉ. बॉबी सरमा बरुआ
15. घरत गणपती, मराठी, नवज्योत नरेंद्र बांदिवडेकर
16. रावसाहेब, मराठी, निखिल महाजन
17. लेव्हल क्रॉस, मल्याळम, अरफाज अयुब
18. कारकेन (KARKEN) Galo Nending Loder
19. भूतपोरी, बंगाली, सौकार्य घोषाल
20. ओंको की कोथिन, बंगाली, सौरव पालोधी
 
मुख्य प्रवाहातील सिनेमा विभाग:
21. कारखानू, गुजराती, रुषभ थँकी
22. 12वी फेल, हिंदी, विधू विनोद चोप्रा
23. मंजुम्मेल बॉईज, मल्याळम, चिदमब्रम
24. स्वर्गरथ, आसामी, राजेश भुयान
25. कल्की 2898 AD (3D), तेलुगु, सिंगिरेड्डी नागासविन
 
नॉन-फीचर फिल्म ज्युरी (निवड समिती) मध्ये सहा सदस्य होते. ख्यातनाम माहितीपट आणि वन्यजीव चित्रपट दिग्दर्शक आणि व्ही. शांतराम जीवनगौरव पुरस्कार विजेते सुब्बिया नल्लामुथु यांनी त्याचे नेतृत्व केले.
 
भारतीय पॅनोरमा नॉन फीचर फिल्म्स ज्युरी सदस्य:
 
1. रजनीकांत आचार्य, निर्माता आणि चित्रपट दिग्दर्शक
2. रोनेल हाओबाम, चित्रपट दिग्दर्शक
3. उषा देशपांडे, चित्रपट दिग्दर्शिका आणि निर्मात्या
4. वंदना कोहली, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखिका
5. मिथुनचंद्र चौधरी, चित्रपट दिग्दर्शक
6. शालिनी शहा, चित्रपट दिग्दर्शिका
 
भारतीय पॅनोरमा 2024 मध्ये निवडलेले 20 नॉन फीचर चित्रपट:
 
अनुक्रमांक/ चित्रपटाचे शीर्षक/ भाषा/ दिग्दर्शकांचे नाव
1. 6-A आकाश गंगा/ हिंदी/ निर्मल चंदर
2. अमर आज मारेगा/ हिंदी/ रजत करिया
3. अम्माज् प्राईड/ तमिळ/ शिव कृष
4. बही - ट्रेसिंग माय ॲन्सेस्टर्स/ हिंदी/ रचिता गोरोवाला
5. बॅलड ऑफ द माउंटन/ हिंदी/ तरुण जैन
6. बट्टो का बुलबुला/ हरियाणवी/ अक्षय भारद्वाज
7. चांचिसोआ/ गारो/ एल्वाचिसा च संगमा, दिपंकर दास
8. फ्लेंडर्स दी जमीन विच/ पंजाबी/ सचिन
9. घर जैसा कुछ/ लडाखी/ हर्ष संगानी
10. घोडे की सवारी/ हिंदी/ देबजानी मुखर्जी
11. गुगल मॅट्रिमोनी/ इंग्रजी/ अभिनव अत्रे
12. मैं निदा/ हिंदी/ अतुल पांडे
13. मो बोऊ, मो गान/ उडिया/ सुभाष साहू
14. मोनिहारा/ बंगाली/ सुभदीप बिस्वास
15. पी फॉर पापराझी/ हिंदी/ दिव्या खारनारे
16. पिलर्स ऑफ प्रोग्रेस : द एपिक स्टोरी ऑफ दिल्ली मेट्रो/ इंग्लिश/ सतीश पांडे
17. प्राण प्रतिष्ठा/ मराठी/ पंकज सोनवणे
18. रोटी कुण बनासी?/ राजस्थानी/ चंदन सिंग
19. सावट/ कोकणी/ शिवम हरमळकर, संतोष शेटकर
20. सिवंता मन्न/ तमिळ/ इंफॅन्ट
Powered By Sangraha 9.0