पुण्यात अजित पवार गटाला सुरुंग; खंदे समर्थक शरद पवार गटाच्या वाटेवर

    22-Oct-2024
Total Views |

Khande supporters on the way to Sharad Pawar group
(Image Source : Internet) 
 
पुणे :
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या गटात मोठे खिंडार पडले आहे. अजित पवारांचे खंदे समर्थक समजले जाणारे नाना काटे शरद पवार गटात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. चिंचवड विधानसभा मतदारसंघात अजित पवारांना धक्का बसणार आहे. नाना काटे यांचं जयंत पाटलांशी बोलणं झाल्याची माहिती आहे. नाना काटे समर्थकांसह मुबंईत शरद पवारांची भेट घेणार आहेत.
 
गेल्या काही वर्षांपासून या पट्ट्यातील प्रमुख नेते अजित पवार यांच्याशी निष्ठावान राहिले आहेत. नाना काटे हेदेखील अजित पवार यांच्या कट्टर समर्थकांपैकी एक म्हणून ओळखले जातात. महाविकास आघाडीत चिंचवडची जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येऊ शकते. त्यामुळेच नाना काटे यांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चा आहेत. अजितदादा यांच्यानंतर शरद पवार साहेबांशी माझी नाळ अधिक जुळलेली आहे. तेव्हा तुतारी फुंकल्यावर आवाज येईलच, असे नाना काटे म्हणाले होते.