छत्तीसगडच्या लोहारडीह घटनेबाबत काँग्रेसचा राज्य सरकारवर निशाणा

    22-Oct-2024
Total Views |
 Lohardih incident of Chhattisgarh
 (Image Source : Internet)
रायपूर :
छत्तीसगडमधील लोहारडीह घटनेबाबत प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष दीपक जैन यांनी सोमवारी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. लोहारडीहची घटना ही छत्तीसगड सरकारचे मोठे अपयश आहे, असे ते म्हणाले. या घटनेच्या निषेधार्थ कावर्धा येथे जिल्हा काँग्रेसने या संदर्भात निदर्शने आयोजित केली आहेत. या घटनेला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशांचा हात होता, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले आहेत. त्याचसोबत गृहमंत्री विजय शर्मा यांनादेखील या घटनेमध्ये त्यांनी दोषी ठरवले आहे.
 
14 सप्टेंबरला कावर्धाच्या लोहारडीहमधील शिवप्रसाद साहू नावाच्या तरुणाचा मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली, ज्यामुळे गावचे माजी सरपंच रघुनाथ साहू यांच्यावर हत्येचा आरोप करण्यात आला. आंदोलकांनी त्यांच्या घराला घेराव घातला आणि रघुनाथ साहू यांच्या कुटुंबीयांना मारहाण केली. या जाळपोळीत रघुनाथ साहू यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर छत्तीसगडचे राजकारण तापले आहे. राज्याचा प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस या घटनेसाठी गृहमंत्री विजय शर्मा यांना जबाबदार धरत आहे. गृहमंत्र्यांना आपल्याच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था सांभाळता येत नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या घटनेबाबत काँग्रेस विजय शर्मा यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.