शरद पवारांची खेळी; ‘हा’ बडा नेता तुतारी हाती घेणार

    21-Oct-2024
Total Views |

 Uday Sangle may join NCP Sharad Pawar group
 (Image Source : Internet)
 
मुंबई :
राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर फोडाफोडीच्या राजकारणात सुरुवात झाली. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात इनकमिंग सुरु आहे. आतापर्यंत अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला. अशात आणखी एक नेता शरद पवार गटात प्रवेश करणार आहे.
 
सिन्नर विधानसभा मतदारसंघातून उदय सांगळे हे निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. ते आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. मुंबई येथे हा पक्ष प्रवेश होणार असून उदय सांगळे हे सिन्नरमधून शरद पवार गटाचे संभाव्य उमेदवार असण्याची शक्यता आहे.