लॉरेन्स बिश्नोई आणि बंबीहा टोळीच्या गुन्हेगारांना अवैध शस्त्रांसह अटक

21 Oct 2024 16:42:09
Lawrence Bishnoi and Bambiha gang criminals arrested
 (Image Source : Internet/ Representative)
पंजाब :
मोगा पोलिसांनी परदेशात राहणारा आणि बंबिहा टोळीशी संबंधित असलेला लकी पटियालच्या एका साथीदाराला आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित मनप्रीत सिंग उर्फ मणी भिंदरच्या तीन साथीदारांना तीन अवैध शस्त्रांसह अटक केली आहे. एकूण चार आरोपींना 6 अवैध शस्त्रांसह अटक करण्यात आली आहे. हे आरोपी मोगा येथील एका व्यावसायिकाला खंडणीसाठी टार्गेट करण्याचा कट रचत होते. पोलिसांनी त्यांच्या विरोधात दोन गुन्हे दाखल केले आहेत.
 
याआधी, रविवारी जालंधर पोलिसांनी बंबीहा-कौशल टोळीच्या पाच गुन्हेगारांना अटक केली होती. त्यांच्याकडून 9 बंदुका आणि 15 काडतुसे जप्त करण्यात आली होती. आरोपींनी मध्य प्रदेशातून या शस्त्रांची तस्करी केली होती, असे तपासात उघड झाले होते.
Powered By Sangraha 9.0