छत्तीसगडच्या दुर्गम आदिवासी भागातील 'माँ महामाया' या विमानतळाचे उद्घाटन

21 Oct 2024 16:45:49
Inauguration of Maa Mahamaya airport
 (Image Source : Internet/ Representative)
छत्तीसगड :
सुरगुजा जिल्हा हा देशातील दुर्गम आदिवासी बहुल भाग हवाई सेवेशी जोडण्यात आला आहे. या जिल्ह्यात प्रथमच हवाई कनेक्टिव्हिटी सुरु झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'माँ महामाया' या विमानतळाचे उद्घाटन केले. 365 एकर जागेवर असलेल्या या विमानतळासाठी 80 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. विमानतळावर 72 आसनी विमान उतरण्याची क्षमता आणि वर्षाला 5 लाख प्रवाशांना सेवा देण्याची क्षमता आहे.
 
सुरगुजा भागातील नागरिकांना यापूर्वी रायपूर किंवा बिलासपूर येथे जाण्यासाठी पाच ते सात तास प्रवास करावा लागत होता. आता या विमानतळामुळे त्यांना दिल्ली, कोलकाता, जबलपूर, रायपूर, जगदलपूर आणि बिलासपूरसारख्या शहरांमध्ये प्रवास करणे सोपे झाले आहे.
 
 
 
छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णु देव साई यांनी X वर याबाबत माहिती दिली आहे. नरेंद्र मोदी यांनी अंबिकापुरच्या दरिमा येथील माँ महामाया एअरपोर्टचे व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून लोकार्पण केले. सरगुजा येथील लोकांचे आठ दशकांपासूनचे स्वप्न पूर्ण झाले असून आदिवासी समुदाय आणि दुर्गम भागांच्या विकासासाठी हे मोठे पाऊल आहे. स्थानिक अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी आणि विकास क्षेत्रासाठी नवीन मार्ग उघडणार असल्याचे ते म्हणाले आहेत. विमानतळामुळे स्थानिक हस्तकला, कुटीर उद्योग आणि कृषी उत्पादने देशभरात सहज पोहोचू शकतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0