शरद पवारांच्या मध्यस्थीने काँग्रेस-ठाकरे गटाचा वाद मिटला!

    21-Oct-2024
Total Views |

Congress Thackeray group dispute resolved
 (Image Source : Internet/ Representative)
 
मुंबई :
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद पेटल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विदर्भातील जागांवरून दोन्ही पक्षात वाद पेटल्याची माहिती आहे.
 
काँग्रेस नेत्यांनी ठाकरे गटाकडून सुरू असलेल्या दबावतंत्रांचा दिल्लीत पाढाच वाचण्या आला. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही मातोश्रीवर आमदारांना एकत्र बोलवत टोकाची भूमिका घेण्याची तयारी दर्शवली होती.
 
पण, ठाकरे गट काँग्रेसच्या वादात मध्यस्थी करत शरद पवार यांनी हा वाद मिटवल्याचे सांगितले जात आहे. शऱद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांना फोनाफोनी करत या वादाला पूर्णविराम दिला आहे. त्यानंतर मंगळवारी (22 ऑक्टोबर) महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब होईल,अशी माहिती समोर येत आहे.
 
दरम्यान काँग्रेस आणि ठाकरे गटात निर्माण झालेल्या वादावर आमदार आदित्य ठाकरे यांनीही शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली होती. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही आपापसात वाद न घालता काँग्रेस हायकमांडनेच यावर लक्ष घालून निर्णय घेतल्याचे सांगितले. तर शरद पवार यांनीही या वादात मध्यस्थी करण्याची विनंती दोन्ही गटाकडून करण्यात आली होती. त्यानंतर शरद पवारांनी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा करून हा वाद सोडविल्याची माहिती आहे.