लाडकी बहीण योजना संदर्भातल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका; आदिती तटकरेंचे आवाहन

21 Oct 2024 17:08:11

Aditi Tatkare
(Image Source : Internet) 
 
मुंबई :
राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (CM Majhi Ladki Bahin Yojana) सुरु केल्यानंतर विरोधकांनी या योजनेवरून सत्ताधाऱ्यांना घेरले. गेल्या काही दिवसांपासून योजेनेसंदर्भात चुकीची माहिती पसरविली जात आहे. अनेक महिला याला बळी पडत आहे. हे पाहता बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी महत्त्वाची माहिती दिली.
 
अदिती तटकरे एक्सवर पोस्ट करत म्हणाल्या की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच राहणार असे स्पष्ट केले आहे. सर्व पात्र भगिनींना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील महिलांनी बळी पडू नये, ही नम्र विनंती असेही अदिती तटकरे पुढे म्हणाल्या आहेत. दरम्यान अदिती तटकरेंनी एक मोठे विधान केले आहे. राज्यातील महिलांनी भूलथापांना बळी पडू नये असे ते म्हणाले आहेत.
 
दरम्यान आतापर्यंत या योजनेचे पाच हप्ते देखील महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता थेट डिसेंबर महिन्याचे पैसे खात्यात येतील. मात्र, हे पैसे नेमके कधी येणार याची कोणतीही तारीख घोषित करण्यात आलेली नाही.
Powered By Sangraha 9.0