Karwa Chauth Special : करवा चौथ पूजेचा शुभ मुहूर्त आणि थाळीत काय साहित्य ठेवावे? जाणून घ्या

20 Oct 2024 00:56:39
 
Karwa Chauth Special Know muhurat and thali ingredients
(Image Source : Internet/ Representative)
 
 
एबी न्यूज नेटवर्क : 
कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला करावा चौथ हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी कृष्ण पक्षातील चतुर्थी म्हणजेच करावा चौथ रविवारी 20 ऑक्टोबर रोजी आली असून आजचा दिवस सर्व विवाहित महिलांसाठी महत्वाचा मानला जातो. धार्मिक मान्यतेनुसार करवा चौथचा व्रत अखंड सौभाग्यासाठी पाळला जातो. हा व्रत योग्य प्रकारे पाळल्यास पती दीर्घायुषी होतो, असे मानले जाते. काहीही ना खाता पिता आणि पाण्याशिवाय हा व्रत पळला जातो. 
 
करवा चौथ व्रत हा सौभाग्यवती महिलांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. असे मानले जाते की भगवान श्रीकृष्णाने द्रौपदीला या व्रताबद्दल सांगितले होते आणि भगवान शिवाने ते माता पार्वतीला सांगितले होते. करवा चौथला मुख्यतः गणेश, गौरी आणि चंद्राची पूजा केली जाते. करवा चौथच्या दिवशी चंद्राची पूजा करून स्त्रिया आपल्या वैवाहिक जीवनात सुख-शांतीची कामना करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

करवा चौथ शुभ मुहूर्त
यावर्षी रविवारी 20 ऑक्टोबरला सकाळी 6.46 वाजता करवा चौथचा शुभ मुहूर्त सुरू होईल आणि 21 ऑक्टोबरला पहाटे 4.16 वाजता तिथी समाप्त होईल. त्याचवेळी, करवा चौथसाठी दोन पूजा मुहूर्त असतील. पहिला अभिजीत मुहूर्त सकाळी 11.43 ते दुपारी 12.28 पर्यंत असेल आणि त्यानंतर, विजय मुहूर्त दुपारी 1.59 ते 2.45 पर्यंत असेल.

करवा चौथ चंद्रोदय वेळ
यावेळी करवा चौथला चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी 7:54 ची आहे.
 
करवा चौथच्या पूजा थाळीत काय ठेवावे?
मातीचा किंवा पितळेचा तांबा
पिठाचा दिवा
थाळी झाकायला कापड 
कलश
चाळणी
फुलं
कच्च दूध
पान
चंदन
अक्षदा (तांदूळ)
मौली 
हळद
कुंकू
तूप
दही
शहद 
कुमकुम
गोड
Powered By Sangraha 9.0