Navratri Special: नवरात्रात उपवास करताना 'हे' नियम पाळणे आवश्यक

    02-Oct-2024
Total Views |

navratri-2023-fasting-rules-importance - Abhijeet Bharat


नागपूर :

भारतात सध्या गणेशोत्सवापासून सणांची धूम सुरु झाली आहे. शरद ऋतु आला म्हणजे नवरात्रीचा सण आला. गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्र देखील मोठ्या आनंद आणि उत्साहाने साजरी केली जाते. यावर्षी हा सण ३ ऑक्टोबरपासून सुरु होत असून १२ ऑक्टोबरला दसरा साजरा करून संपणार आहे.
 
नवरात्र हा मुळात संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ 'नऊ रात्र' असा होतो. ९ दिवसांचा हा उत्सव संपूर्णतः देवी दुर्गाच्या पूजेसाठी समर्पित असतो. नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. भारतात चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. चैत्र नवरात्र ही एप्रिल- मे महिन्यात येते, तर शारदीय नवरात्र सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात साजरी केली जाते. यापैकी शारदीय नवरात्र ही संपूर्ण भारतात मोठी नवरात्र म्हणून ओळखली जाते.
 
उपवास करताना हे नियम पाळणे महत्वाचे:
मान्यतेनुसार, दुर्गा देवीचे पूजन हे समृद्धी आणि यश मिळवण्यासाठी केले जाते. यादरम्यान बरेच लोक नवरात्रात नऊही दिवस उपवास करतात. जुन्या मान्यतेनुसार या ९ दिवसांच्या कालावधीत मांसाहार वगळावा. तसेच मद्यपदार्थांचे सेवनही करू नये. या दरम्यान हलका, सात्विक आहार घ्यावा. जर तुम्ही देखील संपूर्ण ९ दिवसांसाठी उपवास करत असाल, तर काही महत्वाचे नियम पाळणे गरजेचे आहे.
 
१. उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी या पिठाचा वापर करा
उपवासाचे पदार्थ बनवण्यासाठी काही विशिष्ट पीठांचाच वापर केला जातो. यासाठी तुम्ही शिंगाड्याचे, राजगिऱ्याचे, साबुदाण्याचे, वरीच्या (भगर) पिठाचा वापर करू शकता. हे सर्व प्रकारचे पीठ बाजारात सहजपणे उपलब्ध असतात. तसेच उपासाला सध्या तांदळाऐवजी वरीचा तांदूळ (भगर) खाल्ली जाते. याशिवाय मखाने देखील उपवासाला चालतात.
 
२. सैंधव मिठाचा वापर करावा
सैंधव मीठ हे साध्या मिठापेक्षा कमी प्रोसेस केलेले मोठ असते. तसेच यात सोडिअम क्लोराइडचे प्रमाणही कमी असते. हे मीठ विशेषतः उपवासाला वापरले जाते. परंतु बरेच लोक दैनंदिन आहारात देखील साध्या मिठाऐवजी सैंधव मिठाचा वापर करतात.
 
३. विशेष खाद्यतेलाचा वापर
बियांनी बनलेल्या तेलाचा उपयोग वगळावा. त्याव्यतिरिक्त साजूक तूप किंवा शेंगदाण्याचे तेल वापरावे.
 
४. दुग्धजन्य पदार्थ
उपवासाला दूध, दही तसेच दुधापासून बनलेले पदार्थ खाता येईल.
 
५. हे पदार्थ वगळावे
उपवासाला कांदा, लसूण, फळभाज्या वापरल्या जात नाही.