अमरावती मतदारसंघातील राजकारणाचे न्यारेच वारे

    19-Oct-2024
Total Views |
-मविआ, महायुती गोळाबेरजेतच व्यस्त
-अमरावती मतदारसंघातील राजकारणाचे न्यारेच वारे

MNS at Amravati Constituency (Image Source : Internet)
अमरावती:
पक्षाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंत 24 वर्षात पहिल्यांदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (MNS) अमरावती विधानसभा मतदारसंघात खेळी खेळली जात आहे. जी प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकवायला भाग पाळत आहे. निवडणूक लढायची म्हणून लढायची, इतकाच विचार न करता जे काही करायचे ते ‘ताल ठोकुन’ करायचे अशी भुमिका असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पहिल्यांदाच अमरावती विधानसभा मतदारसंघाच्या उतरविले आहे. महापालिकेचे माजी सभापती मंगेश उर्फ पप्पु पाटील यांच्या रुपाने जिल्ह्यातील पाटील, देशमुख जातीय समीकरणात ‘परफेक्ट’ बसणारा व्यक्ती उमेदवार दिल्याने ‘सायलेंट किलर’ च्या भूमिकेत असलेले मनसेचे इंजिन कुणाला साधक आणि कुणाला बाधक ठरेल याची गोळाबेरीज मविआ, महायुतीकडून केली जात आहे. दुसरीकडे या सर्वांना आपण ओव्हरटेक करु या ऐठीत हे इंजिन पुढे धावत आहे.
 
इतर राजकिय पुढा:यांचे विचार जेथे थांबतात तेथून राज ठाकरे यांची रणनिती सुरु होते. दोन वर्षांपुर्वी मनसे प्रमुख राज ठाकरे अमरावतीच्या दौ:यावर असताना त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या आखणीमध्ये अमरावती मतदारसंघाचा समावेश केला होता. त्यामूळे शहर, जिल्ह्यातील कार्यकारिणीमध्ये तातडीने फेरबदल करत ‘काम दाखवा आणि टीकून रहा’ हे धोरण ठेवले. ज्याचा परिपाक मनसेने जिल्ह्यात एक मजबूत पकड निर्माण केली. विशेषत: कधीकाळी मोजके पदाधिकारी असलेल्या मनसे च्या आज अमरावती शहरात विविध आघाड्या कार्यशील आहे.
 
आता पक्षाची बांधणी मजबूत आहे, असा विश्वास निर्माण झाल्यावरच राज ठाकरेंनी अमरावती विधानसभा मतदारसंघात पप्पु पाटील यांना उमेदवारी घोषीत केली. आजी-माजी आमदारांच्या मुंबई वा:या सुरु असताना पप्पु पाटील यांनी नियोजनबध्दरित्या प्रचाराचा नारळ फोडला आणि दिग्गजांसमोर आपले आव्हान उभे केले. महाविकास आघाडी आणि महायुतीचा बंडखोरांशी झुंजण्यात बराच वेळ निघून जाईल, असे दिसत असताना मनसे चे इंजिन मात्र या संधीचे सोने करित अनेक दूरपर्यंत मजल मारेल यात दुमत नसावे.