अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगकडून धमकी; वाद मिटवण्यासाठी केली 'इतक्या' पैशाची मागणी

18 Oct 2024 18:15:06

Lawrence Bishnoi gang threatened Salman Khan
 (Image Source : Internet/ Representative)
 
मुंबई :
गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेता सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई गँगच्या रडारवर आहे. या गँच्या नावाने त्याला पुन्हा धमकी देण्यात आली आहे. मात्र आता सलमान खानसोबत असलेले भांडण संपवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगने तब्ब्ल 5 कोटी रुपयांची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. अशातच अभिनेता सलमान खानकडे 5 कोटींची मागणी करणारा हा धमकीचा मेसेज मुंबई ट्राफिक पोलिसांना मिळाला आहे. हा मेसेज पाठवणाऱ्या तर्फे आपण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे.
 
ट्रॅफिक पोलिसांच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपद्वारे एक मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये असं नमूद केलं आहे की, लॉरेन्स बिश्नोईसोबतचं वैर संपवण्यासाठी समलान खानकडून 5 कोटी मागितले आहे. तसेच हा मेसेज हलक्यात घेऊ नका, अन्यथा सलमान खानची अवस्था देखील बाबा सिद्दीकींपेक्षा खूप वाईट होईल असा थेट इशारा या धमकीच्या मेसेजमध्ये देण्यात आला आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0