मेटा करणार कर्मचाऱ्यांची छाटणी?

    18-Oct-2024
Total Views |

Meta is laying off employees
(Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
सणासुदीच्या काळात मेटा कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची पुन्हा छाटणी करण्याचा विचार करत आहे. वृत्तसंस्थांच्या माहितीनुसार, मेटा कंपनीने 2022 मध्ये सुमारे 11,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्यानंतर 2023 मध्ये 10,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यात आले. आता सलग तिसऱ्या वर्षी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचा विचार करत आहे. या वेळी हा आकडा मागील दोन वर्षांएवढा मोठा नसला तरी अनेकांच्या नोकऱ्या गमवाव्या लागतील.
 
मेटा कंपनीने त्यांच्या व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम आणि थ्रेड्स सारख्या सर्व प्लॅटफॉर्मवरून कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सांगितले आहे. मेटा कंपनीतील कर्मचारी जेन मेनचुन वोंग यांनी यावर पोस्ट केले की 'मी अजूनही हे सत्य स्वीकारू शकत नाही. मला सांगण्यात आले आहे की, माझा मेटामधील वेळ आता संपला आहे. मी सर्वांचे आभार मानू इच्छितो, विशेषत: माझ्या इंस्टाग्राम आणि थ्रेड्स टीममेट्स. त्यांच्यामुळे माझा मेटा प्रवास जंगली झाला आहे. माझ्यासोबत सॉफ्टवेअर आणि सिक्युरिटी इंजिनिअरिंगवर काम करण्यास इच्छुक असलेले कोणीही माझ्याशी ईमेल, लिंक्डइन किंवा माझ्या वैयक्तिक वेबसाइटद्वारे संपर्क साधू शकतात.'