कोळसा खाणीसाठी झाडे तोडल्याने ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये तणावाचे वातावरण

18 Oct 2024 15:48:17
Clash of trees for coal mining
 (Image Source : Internet)
छत्तीसगड:
सुरगुजा जिल्ह्यातील परसा येथील गावात कोळसा खाणीसाठी झाडे तोडण्यास विरोध करणारे गावकरी आणि पोलिस यांच्यात मोठा वाद झाला असून यामध्ये महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अनेक पोलिस जखमी झाले. गावकऱ्यांच्या हल्ल्यात आठ पोलीस आणि दोन महसूल विभागाचे कर्मचारी जखमी झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
 
परसा येथे कोळसा खाणीसाठी झाडे तोडण्याच्या विरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 6000 झाडे तोडली जात असून यामुळे सुमारे 140 हेक्टर जंगल नष्ट होणार आहे. गावातील झाडे तोडण्यास विरोध केल्यामुळे ग्रामस्थ आणि पोलिसांमध्ये हाणामारी झाली. विशेषत: ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, पोलिस दल आणि वनविभागाचे कर्मचारी खासगी कंपनीसाठी झाडे तोडत आहेत. या संघर्षात आठ पोलिस आणि दोन महसूल कर्मचारी जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या घटनेमुळे उदयपूर, परसा आणि आसपासच्या गावांमध्ये तणावाचे वातावरण आहे. कारण ग्रामस्थ सातत्याने झाडे तोडण्याला विरोध करत आहेत. तरीही, या भागात पोलिसांच्या उपस्थितीत मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्याचे काम सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0