शेख हसीनासह ४५ जणांविरुद्ध अटक वॉरंट जारी

    18-Oct-2024
Total Views |

Arrest warrant issued against Sheikh Hasina
 (Image Source : Internet)
 
एबी न्यूज नेटवर्क :
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना आणि इतर ४५ जणांविरुद्ध गुरुवारी मानवतेविरुद्धच्या कथित गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केला आहे.
 
सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना बांगलादेशातून पळून भारतात आश्रय घेण्यास भाग पाडले गेले. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यायाधिकरणाने अधिकाऱ्यांना शेख हसीना आणि अन्य ४५ आरोपींना १८ नोव्हेंबरपूर्वी हजर करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायमूर्ती मोहम्मद गोलाम मुर्तझा मजुमदार यांच्या अध्यक्षतेखालील न्यायाधिकरणाने आरोपींविरुद्ध अटक करण्याच्या मागणीसाठी फिर्यादीने दाखल केलेल्या दोन याचिकांबाबत हा आदेश दिला. मुख्य सरकारी वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी ही माहिती दिली.