सुभाष बोरकरची दगडाने ठेचून हत्या

    17-Oct-2024
Total Views |
Subhash Borkar was stoned to death (Image Source : Internet/ Representative)
वाडी:
वाडी येथील लाव्हा खडगाव मार्गाच्या ५०० मिटर बाहेरील भागात सुभाष गुलाब बोरकर वय ५५ रा. वाडी यांच्या डोक्यावर दगड घालून हत्या केल्याची घटना मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार बुधवार १६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास वाडी पोलीस ठाण्याला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची माहिती मिळताच वाडी पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला. सुभाषच्या कुटुंबीयांनी सांगितले की, तो मंगळवारी रात्री १०.३० वाजता पासून बेपत्ता होता आणि तो फोनही उचलत नव्हता.सुभाषला तीन मुले असून तो अनेक दिवसांपासून दारू विक्रीचा व्यवसाय करत होता. अशी माहिती वाडी पोलिसांना मिळाली. घटनास्थळी डी.सी.पी लोहित मतानी, एसीपी सतीश गुरव, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे पोहचून पुढील तपास करीत आहे. अवैध दारू विक्रीमुळे किंवा पैसाच्या देवाणघेवाण मुळे खून झाल्याचे नागरीकांचे म्हणणे आहे. घटनास्थळी सीसीटीव्ही असल्याची माहिती असूनही आरोपी अद्याप फरार असल्याचे समजते.