दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी; १० ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

    17-Oct-2024
Total Views |

Gold prices hike ahead of Diwali
 (Image Source : Internet/ Representative)
 
नागपूर :
दसऱ्यानंतर आता दिवाळीच्या तोंडावर सोन्याला झळाळी आली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला 15 ऑक्टोबर रोजी सोनं 220 रुपयांनी स्वस्त झाले. 16 ऑक्टोबर रोजी त्यात पुन्हा 490 रुपयांची वाढ झाली. तर आज 17 ऑक्टोबर रोजी देखील दरवाढीचे संकेत मिळत आहेत. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोनं 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 78,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
 
सोन्यासोबतच चांदीचे दरही वाढले आहे. 5 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वाढली. तर 8 आणि 9 ऑक्टोबर रोजी चांदी 3 हजार रुपयांनी उतरली. 11 ऑक्टोबर रोजी चांदी 2 हजारांनी वाढली. या आठवड्यात चांदीमध्ये कोणतेच बदल झाले नाही. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 97,000 रुपये आहे.