माझ्या आईची शेवटची आठवण प्लिज परत करा!; तरुणाची चोराला कळकळीची विनंती

16 Oct 2024 16:25:36

Pune young man requests thief to return his Mothers Memory
 (Image Source : Instagram/ abhayanjuu)
 
पुणे :  
सध्या सोशल मीडियावर एका तरुणाची पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये तरुण हातात पोस्टर घेऊन चक्क चोराला त्याची चोरलेली गाडी परत करण्याबाबत कळकळीची विनंती करताना दिसत आहे.
 
हा तरुण पुण्यातील रहिवासी असून अभय चौगुले असे त्याचे नाव आहे. अभयची काळ्या रंगाची ॲक्टिव्हा कोथरूड येथून दसऱ्याच्या दिवशी चोरीला गेली. ही स्कूटर त्यांच्या दिवंगत आईची शेवटची भेट असल्याने ती त्याच्यासाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे अभयने सोशल मीडियावर 'माझ्या आईची शेवटची आठवण प्लिज परत करा!' अशी चोराला विनंती करणारी पोस्ट केली आहे. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळील कोथरूड परिसरातून दसऱ्याच्या दिवशी चोरीला गेलेली स्कूटर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून आणि परिसरात शोध घेतल्यानंतरही मिळाली नाही. अशात अभय चौगुले याने ती गाडी त्याच्यासाठी फार अमुल्य आहे, त्यामुळे ज्यांनी कुणी ती गाडी चोरली आहे, ती परत करण्याची विनंती केली. इतकेच नाही तर ती गाडी चोरणाऱ्या व्यक्तीला नवीन गाडी घेऊन देण्याची ऑफरही त्याने दिली आहे.
 
 
 
अभय चौगुले याने आपल्या पोस्टमधील हातात असलेल्या फलकावर लिहिले आहे की, माझी गाडी चोरीला गेली आहे. काळ्या रंगाची ॲक्टिव्हा MH14BZ6036. माझी गाडी चोरणाऱ्या चोराला नम्र विनंती, आईने खूप कष्ट करून १२ वीत गाडी घेतली होती, माझ्या आईची ती शेवटची आठवण आहे, प्लिज परत करा! मी तुम्हाला नवीन गाडी घेऊन देतो. माझ्या आईची गाडी परत द्या प्लिज.'
Powered By Sangraha 9.0