कोजागिरी पौर्णिमा २०२४ : कुटुंबियांसह आनंदाचे क्षण घालवण्याचा दिवस

    16-Oct-2024
Total Views |
Kojagiri Poornima 2024 (Image Source : Internet/ Representative)
 
शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमा, हा हिंदू धर्मातील एक विशेष उत्सव आहे. आश्विन महिन्याच्या पौर्णिमेला संपूर्ण भारतात विविध समाज मोठ्या आनंदाने हा उत्सव साजरा करतात. या दिवशी चंद्राला पाहणे खूप महत्वाचे मानले जाते. कोजागिरी पौर्णिमा हा एक खास सण आहे, जो प्रेम, एकता आणि समृद्धीचा संदेश देतो. हा सण साजरा करण्यासाठी अनेक लोक एकत्र येतात. म्हणूनच, या दिवशी एकत्र येणे आणि विशेष प्रकारच्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्याला महत्त्व दिले जाते. कोजागिरी पौर्णिमा ही एक सुंदर परंपरा आहे, जी आपल्याला आपल्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवण्याची संधी देतो.
 
ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, कोजागिरी पौर्णिमा १६ ऑक्टोबर रोजी रात्री ८:४१ वाजता सुरू होईल. तसेच, ती दुसऱ्या दिवशी म्हणजेच १७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:५३ वाजता संपेल. शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्राच्या किरणांतून अमृतवृष्टी होते, असे मानले जाते. त्यामुळे या दिवशी चंद्रप्रकाशात आटवलेले दूध तयार करण्याची परंपरा आहे.
 
१६ ऑक्टोबर रोजी कोजागरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी रवि योगही तयार होत असल्याने या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या दिवशी चंद्राच्या उजेडात दूध आटवून त्यात केशर, पिस्ता, बदाम, चारोळी, वेलदोडे, जायफळ, साखर आणि इतर सुगंधित गोष्टी घालून लक्ष्मी देवीला नैवेद्य दाखविला जातो. या नैवेद्यात चंद्राच्या किरणांचा स्पर्श असतो, म्हणूनच दूध मध्यरात्री पूर्ण चंद्राच्या किरणांत ठेवण्याला महत्त्व आहे. या दिवशी मध्यरात्रीपर्यंत जागरण केले जाते. यावेळी लोक एकत्र येऊन गाणी, नृत्य सादर करतात आणि कथा सांगतात. या दिवशी चंद्राच्या प्रकाशात आटवलेले दूध पिल्याने आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे म्हटले जाते.