वाडी:
नागपूर तालुक्यातील गोधनी रेल्वे (Godhani Railway) येथील समता पार्क मध्ये आंतर शालेय कराटे स्पर्धा व कराटे प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नागपूर पं.स. च्या सभापती रुपाली मनोहर यांच्या हस्ते माजी महापौर संदीप जाधव , मानकापूर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या उपस्थितीत रविवारी करण्यात आले. या स्पर्धेत एकुण २०० स्पर्धकांनी भाग घेतला होता.
विजयी खेळाडुना सन्मानचिन्ह व ट्रॉफी मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कराटे प्रशिक्षक निलेश मिश्रा, भावना पराये , हर्ष धडकर, प्रज्वल वासनीक, प्रियांशु मिश्रा , महिमा सिंग, प्रतिज्ञा दहात, आकांशा कनोजिया, नुपुर ठाकुर , जानवी कनोजिया, राशी मिर्चे यांनी केले. यावेळी संजय महाजन ,राहुल मनोहर , अमर खोडे, बॉक्सिंग प्रशिक्षक समीप नरुले, योगेश मिश्रा संजीवनी कुमरे , सुरेखा गजभिये , उत्कर्ष मनोहर,प्रशिक्षक सूरज गोडे,प्रशिक्षक प्रशांत मानकर उपस्थित होते.