'प्रेमास रंग यावे' मालिकेत आदिनाथ कोठारेची खास एंट्री; प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

    15-Oct-2024
Total Views |

Adinath Kothares special entry in Premas Rang Yave serial
 (Image Source : Agency)
 
मुंबई :
सन मराठीवरील लोकप्रिय मालिका 'प्रेमास रंग यावे' प्रेक्षकांना मनोरंजनासोबत एक सामाजिक संदेश देत आहे. या शोमध्ये अमृता फडके अक्षराच्या भूमिकेत दिसत आहे, जिथे ती संसार आणि जबाबदारीच्या संघर्षातून मार्ग काढताना दिसत आहे. अमृताच्या सशक्त अभिनयामुळे अक्षराची भूमिका अधिक भावपूर्ण वाटते.
 
या रोमांचक प्रवासात आता आणखी एक आकर्षण म्हणजे अभिनेता आदिनाथ कोठारेची विशेष एंट्री या मालिकेत होणार आहे. जो त्याचा आगामी चित्रपट 'पाणी'चे प्रमोशन करताना दिसणार आहे. त्याच्या एंट्रीने प्रेक्षकांची आवड अजून वाढणार आहे. आदिनाथ याची भूमिका आणि त्याचा आगामी चित्रपट 'पाणी' याची चर्चा कथेच्या धाग्याशी जोडली जाणार आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना या भागाची अधिक उत्सुकता लागणार आहे.