भारतीय कंपनीचा कर्मचाऱ्यांवर दयाळूपणा; मर्सिडीज बेंझसारख्या आलिशान कार दिल्या भेट

    14-Oct-2024
Total Views |
Indian Company Surprises Employees with Mercedes Benz Cars
 (Image Source : Internet/ Representative)
नवी दिल्ली :
चेन्नईतील 'टीम डिटेलिंग सोल्युशन्स' या स्टील डिझाईन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या काळात अनोखी भेट दिली आहे. कंपनीने आपल्या 28 कर्मचाऱ्यांना कार तर 29 जणांना बाईक भेट दिल्या आहेत, ज्यात हुंडई, टाटा, मारुती सुझुकी आणि मर्सिडीज बेंझ यांसारख्या ब्रँडेड वाहनांचा समावेश आहे. हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या मेहनतीची कदर करण्याच्या उद्देशाने घेतला गेला आहे.
 
कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक श्रीधर कन्नन यांनी सांगितले की, कंपनीच्या यशात कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे आणि त्यांची मेहनत ओळखून त्यांना ही भेट देण्यात आली आहे. कन्नन म्हणाले, आमचे कर्मचारी आमची सर्वात मोठी संपत्ती आहेत. साधारण पार्श्वभूमीतून आलेले हे सर्व कर्मचारी अत्यंत कुशल आहेत आणि त्यांच्यासाठी कार किंवा बाईक खरेदी करणे हे स्वप्नपूर्तीसारखे आहे. याव्यतिरिक्त, कंपनीने कर्मचाऱ्यांना लग्नासाठी देण्यात येणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ केली आहे. पूर्वी 50,000 रुपये दिले जात होते, परंतु आता ती रक्कम 1 लाख करण्यात आली आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल आणि त्यांचे प्रेरणाही वाढेल, असा विश्वास व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.