सणासुदीच्या काळात विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता

    14-Oct-2024
Total Views |
 
Air travel likely to become affordable during festive season
 (Image Source : Internet/ Representative)
 
एबी न्यूज नेटवर्क :
देशात दरवर्षी सणासुदीच्या काळात विमान कंपन्या भाडे झपाट्याने वाढवतात. अनेक वेळा सणांजवळ लोकांना दुप्पट भाडे मोजून प्रवास करावा लागतात. मात्र, यावेळी विमान भाड्यात कमालीची कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
 
कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा आता हवाई प्रवाशांना होत आहे. याशिवाय अनेक विमान कंपन्यांच्या वाढीव प्रवासी क्षमतेचा लाभही प्रवाशांना मिळत आहे. विविध मार्गांवरील हवाई भाडे जवळपास 25 टक्क्यांनी कमी झाले आहेत.
 
एका ट्रॅव्हल पोर्टलच्या अहवालानुसार, देशांतर्गत मार्गावरील विमान भाडे 20 ते 25 टक्क्यांनी कमी झाले आहे. एकेरी प्रवासासाठी हे भाडे कमी करण्यात आले आहे. कंपनीने महिनाभरापूर्वी केलेल्या बुकिंगच्या आधारे हा अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार, बेंगळुरू-कोलकाता मार्गावरील कमाल भाडे कमी झाले आहे. गेल्या वर्षी या दोन शहरांदरम्यानच्या विमान प्रवासाची किंमत 10,195 रुपये होती. या वर्षी तुम्ही फक्त 6,319 रुपयांमध्ये प्रवास करू शकता. अशाप्रकारे, या दोन शहरांमधील उड्डाण दर गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे 38 टक्क्यांनी कमी झाला आहे.