महिलांचा आधार – सखी वन स्टॉप सेंटर

11 Oct 2024 01:00:25
 
Sakhi One Stop Centre
 (Image Source : Internet)
गडचिरोली:
संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उदेशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडुन “सखी वन स्टॉप सेंटर” (Sakhi One Stop Centre) ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक सखी वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे.
 
सखी वन स्टॉप सेंटर या नावाने प्रसिध्द असलेली ही योजना 1 एप्रिल2015 पासुन लागू करण्यात आली आहे. सदर योजनेच्या निकषानुसार शारीरी, लैगींक,भावनिक,मानसिक आणि आर्थिक शोषनाला बळी पडलेल्या अठरा वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीसह सर्व महिलांना आवश्यक ती मदत सखी वन स्टॉप सेंटर च्या छताखाली दिल्या जाते.
 
छत एक सेवा अनेक
हिंसाचाराच्या विरोधात लढण्यासाठी एकाच छताखाली अनेक सेवा पिडीत महिला व मुलींसाठी उपलब्ध करुन दिल्या आहेत. ज्यामध्ये वैद्यकीय सेवा ,कायदेशीर मदत व समुपदेशन ,पोलीस मदत , तात्पुरती निवासाची सोय, मानसिक समुपदेशन, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सुविधा,रेस्क्यु सर्विसेस व आपतकालीन सेवा यासारख्या विविध सेवांसाठी भटकंती न करता एकाच छताखाली पिडितेला सर्व सुविधा तात्काळ पुरविल्या जातात.
 
केंद्र शासनाच्या अनेक यशस्वी योजनांपैकी सखी वन स्टॉप सेंटर हि एक महत्वपुर्ण व महिलांच्या दुष्टीने उपयोपी असणारी एक यशस्वी ठरलीआहे.केंद्र पुरस्कृत सखी सेंटर चें कार्यान्वय व नियंत्रण करण्यासाठी जिल्हाधिकारी गडचीरोली यांचे अध्यक्षतेखालीतथा सदस्य / सचिव जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, गडचिरोली याच्या नियंत्रणात केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर ,व्यवस्थापन समितीगठीत करण्यात आली आहे.
 
जिल्ह्यातील शोषीत व पिडीत महिला व युवतींनी वन स्टॉप सेंटर कडुन देण्यात येणाऱ्या सेवाचा लाभ घ्यावा तथा अंगणवाडी सेविका ,आशा वर्कर ,सामाजिक कार्यकर्ते ,पोलीस स्टेशन ,रुग्णालय व सामान्य नागरीक यांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील संकटग्रस्त महिला व मुलींना केंद्र पुरस्कृत सखी वन स्टॉप सेंटर, गडचिरोली येथे पाठवुन सामाजिक जबाबदारी पुर्ण करावी तथाआपल्याआजुबाजुच्या परिसरात अशी पिडीत महिला/मुलगी आढळून आल्यास खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करुन महिला सक्षमीकरणात योगदान द्यावे असे आवाहन मा .जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी,गडचिरोली यांचे मार्गदर्शनात सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक(प्रभारी) प्रणाली बी. सुर्वे व त्याच्या सर्व कर्मचाऱ्यानी केले आहे.
 
संपर्क कुठे करावा?
हेल्पलाईन क्रमांक :- 181, 112, 1098, 1091, 155209
कार्यालय सपर्क क्रमांक :- 07132-295675
कार्यालय मोबाई क्रमांक :- 9404354543
कार्यालय पत्ता :- जुनी धर्मशाळा,जिल्हा सामान्य रुग्णालय परिसर, मुल रोड, कॉम्प्लेक्स, गडचिरोली.
Powered By Sangraha 9.0