बेरूत लेबनॉन : मध्य बेरूतमध्ये इस्रायली हवाई हल्ल्यात 22 जणांचा मृत्यू ,117 जखमी

    11-Oct-2024
Total Views |
Israeli airstrikes in central Beirut
 (Image Source : Internet)
इस्रायल :
लेबनॉनच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, इस्रायली हवाई हल्ल्यांमध्ये बेरूतच्या रास अल-नबा परिसरातील निवासी इमारतींना लक्ष्य केले गेले, ज्यात किमान 22 जणांचा मृत्यू झाला असून 117 जण जखमी झाले आहेत. अल जझीराच्या अहवालानुसार, गुरुवारी मध्यरात्री अचानक हल्ले झाले, ज्याची कोणतीही पूर्वसूचना नव्हती. राजधानीच्या मध्यभागी दोन निवासी इमारतींवर हल्ला करण्यात आला, जिथे अनेक विस्थापित लोकांना आश्रय दिला जात होता.
 
हा हल्ला सप्टेंबरच्या उत्तरार्धात लष्करी मोहिमेचा विस्तार झाल्यापासून बेरूतच्या उपनगरातील दाहियाहच्या बाहेरचा तिसरा इस्रायली हल्ला आहे. यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी कोला आणि 3 ऑक्टोबर रोजी बाचौरा या भागांना लक्ष्य करण्यात आले होते. हल्ल्यांमुळे जवळपास एक मैल अंतरावरून धक्के जाणवले आणि इमारतीतून धूर आणि ज्वाळा निघत होत्या. आपत्कालीन सेवांनी घटनास्थळी तत्काळ प्रतिसाद दिला आणि रहिवाशांनी आपली घरे रिकामी करून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. लेबनॉनच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, बेरूतवर झालेल्या या तिसऱ्या हवाई हल्ल्यात ११ जणांचा मृत्यू झाला असून 48 जण जखमी झाले. दरम्यान, गाझा पट्टीवरही इस्रायली हवाई हल्ल्यात 63 जणांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले आहे.