(Image Source : Internet)
नागपूर :
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ठ क्रीडापटूंना व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा, प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. या पुरस्कारांसाठी अर्ज पाठवण्याचे सांगितले आहे.
क्रीडा क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिले जाणारे पुरस्कार
ज्येष्ठ क्रीडा महर्षीकरीता जीवन गौरव पुरस्कार,
क्रीडा मार्गदर्शकाकरीता उत्कृष्ठ क्रीडा मार्गदर्शक,
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू),
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम),
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) व जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक)
8 ते 22 पर्यंत पाठवा अर्ज
सन 2022-23 या वर्षाच्या पुरस्कारासाठी 8 ते 22 जानेवारी 2024 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहे. पुरस्काराकरीता राज्यातील ज्येष्ठ क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, दिव्यांग खेळाडू व साहसी यांच्याद्वारा अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करणाऱ्या नागपूर जिल्हयातील इच्छुक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू, साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहित मुदतीत क्रीडा विभागाच्या
https://sports.maharashtra.gov.in संकेतस्थळावरील स्क्रोलिंग लिंक मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर 22 जानेवारी 2024 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पल्लवी धात्रक यांनी केले आहे.