नागपूर :
रस्ते अपघातात बहीण-भावाच्या मृत्यूनंतर अवैधरित्या लोकांना गोळा करून टिप्परला आग लावणे आणि दगडफेक केल्याप्रकरणी आरोपी जिल्हा परिषदेच्या सभापती अवंतिका लेकुरवाळे, त्यांचे पती रमेश लेकुरवाळे, उपसभापती आशीष मल्लेवार आणि अतुल बाळबुथे यांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
29 डिसेंबरला बिडगाव परिसरात टिप्पर चालकाने सायकलस्वार बहीण-भावाला चिरडले होते. त्यांच्या मृत्यूने स्थानिक नागरिकात संतापाची लाट उसळली. लेकुरवाडे आणि मल्लेवार समर्थकांसह तेथे पोहोचले. टिप्परला आग लावण्यात आली आणि दगडफेकही करण्यात आली. वाठोडा पोलिसांनी एकूण 37 जणांना विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. लेकुरवाळेचे वकील रवींद्र आर. राजकारणे यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. त्यांनी न्यायालयाला सांगितले की, गुन्हा नोंदविण्यात 12 तासांचा विलंब झाला आहे. एफआयआरमध्ये आरोपींची भूमिकाही स्पष्ट नाही. त्यांच्या कोठडीची आवश्यकता नाही. त्यामुळे सर्वांचा जामीन मंजूर करण्यात यावा. न्यायालयाने चौघांनाही सशर्त जामीन मंजूर केला.