आरटीओ निरीक्षक गायकवाडची 7 तास चौकशी

    30-Jan-2024
Total Views |
-अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाचा जबाबही नोंदविला
 
7 hours interrogation of rto inspector gaikwad
                                                                                                               (image source: internet/representative)  
 
 
नागपूर:
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर सोमवारी प्रादेशिक परिवहन विभागाचे निरीक्षक संकेत गायकवाड गुन्हे शाखेच्या कार्यालयात पोहोचले. त्यांच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात गुन्हे शाखेने त्यांना चौकशीसाठी कार्यालयात बोलावले होते. सात तासांपर्यंत त्यांची चौकशी झाली, मात्र एकाही प्रश्नाचे उत्तर मिळाले नाही.
 
उल्लेखनिय आहे की, 5 मे 2022 रोजी गायकवाड यांच्या पायाला गोळी लागली होती. हा केवळ अपघात असल्याचे सांगून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना गोळी चालली नाहीतर चालविण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्यांनी गुन्हे शाखेला प्रकरणाचा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले. प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला. यात आरटीओच्याच निरीक्षक गीता शेजवळ यांना आरोपी करण्यात आले. सोबत गायकवाड यांच्या विरुद्धही पुरावा नष्ट करण्याचा गुन्हा नोंदविण्यात आला.
 
सत्र न्यायालयाने शेजवळ यांचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच गायकवाड यांना चौकशीच्या 48 तासांपूर्वी नोटीस देण्यास सांगितले. गत अनेक दिवसांपासून पोलिस गायकवाड यांची प्रतीक्षा करीत होते. अखेर सोमवारी सकाळी 10.30 वाजता गायकवाड गुन्हे शाखा कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी प्रकरणाशी संबंधित 27 प्रश्नांची यादी बनवली होती. मात्र प्रत्येक प्रश्नावर गायकवाड एकतर गप्प रहिले किंवा कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. इतकेच नाहीतर गोळीबाराबाबतही माहिती नसल्याचे सांगितले. या दरम्यान पोलिसांनी घटनेच्या दिवशी अपार्टमेंटमध्ये तैनात सुरक्षा रक्षकाची चौकशी केली.
 
सुरक्षा रक्षकाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी फ्लॅटमधून भांडणाचा आवाज येत होता. काही वेळाने गोळी चालल्यासारखा आवाज आला. काय झाले ते पाहण्यासाठी तो फ्लॅटमध्ये गेला असता काचेमुळे पायाला जखम झाल्याचे सांगण्यात आले. काही वेळाने चारजण गायकवाड यांना रुग्णालयात घेऊन जाताना दिसले. पोलिसांना संशय आहे की, आरटीओ अधिकाऱ्यांकडून गोळा केल्या जाणाऱ्या रकमेवरून हा वाद होता. त्यामुळे इतर अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जात आहे.