नागपूर :
सध्याच्या दगदगीच्या जीवनात नोकरी, कुटुंब आणि जबाबदाऱ्या पार पाडण्यात आजची स्त्री स्वतःला विसरत चालली आहे. त्यातच लग्नानंतर आपला संसार आणि मुलाबाळांना सांभाळण्यात एक स्त्री स्वतःला पूर्णपणे झोकून देते. इतरांप्रमाणे आपले अस्तित्व देखील तितकेच महत्वाचे आहे, याचा कुठेतरी तिला विसर पडत असतो. याच स्त्रियांसाठी 'सोनेरी पहाट'ने एक नवा उपक्रम हाती घेत 'सुपर मॉम' स्पर्धेची सुरुवात केली आहे. यावर्षी या स्पर्धेचे चौथे सिजन आहे.
सोनेरी पहाटच्या संचालिका रेखा भोंगाडे यांनी 'सुपर मॉम 2024' (Super Mom 2024) ब्युटी पेजन्ट कॉन्टेस्ट सिजन 4 चे आयोजन केले आहे. नागपुरातील व्हीआयपी रोड स्थित वनामती सभागृहात येत्या 4 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 12 ते सायंकाळी 7 या वेळेत 'सुपर मॉम 2024' स्पर्धेचा ग्रँड फिनाले आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमात फॅशन डिझायनर नादिया हुसैन प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील.
'सुपर मॉम 2024' सिजन 4 स्पर्धेत मेकअप, कला आणि मनोरंजन, सौंदर्य, फॅशन, शिक्षण, सामाजिक, आदरातिथ्य, ब्रँड, चित्रपट दिग्दर्शक, इव्हेंट नियोजक, क्रीडा, मॉडेलिंग या श्रेण्यांमध्ये अवॉर्ड्स देण्यात येणार आहेत. दरम्यान, सोनेरी पहाटच्या संचालिका रेखा भोंगाडे या एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून महिलांसाठी अनेक कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करत असतात. स्त्रियांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांनी 'सोनेरी पहाट' संस्थेची सुरुवात केली आहे.