स्व. प्रबोधनकार ठाकरे स्मृती माध्यमिक शाळेतील विद्यार्त्यांचा खासदार क्रीडा महोत्सवात मोठा यश

    27-Jan-2024
Total Views |

prabodhankar thackeray smriti secondary school students great success in khasdar krida mahotsav
 
वाडी:
खासदार क्रीडा महोत्सवात १४ वर्षाखालील विद्यार्थिनींच्या गटात स्व. प्रबोधनकार ठाकरे स्मृती माध्यमिक शाळेतील विद्यार्थिनींनी आट्यापाट्या खेळामध्ये प्रथम व तिसरा क्रमांक पटकाविला. तसेच १४ वर्षाखालील विद्यार्थ्यांच्या गटाने दुसरा क्रमांक पटकाविला. वर्ग नववीची प्रेरणा काळे हिचा धावण्याच्या शर्यतीमध्ये तिसरा क्रमांक आला. माही धूमनखेडे हिने ॲथलेटिक्स मधील लांब उडी प्रकारात प्राविण्य मिळविले. १४ वर्ष वयोगटाखालील विद्यार्थिनींच्या गटाची राज्यस्तरावर वाशीम येथे निवड झाली आहे. वर्ग सहावीची विद्यार्थिनी स्वरा खरवडे हिने कराटे मध्ये प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक प्राप्त केले.
 
या सर्व विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक अलोक खोकले, संस्थेचे सचिव नारायणराव घोडखांदे, संस्थेच्या संचालिका मीनाक्षी घोडखांदे, हर्षला घोडखांदे यांनी मार्गदर्शन केले. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना डायगव्हाणे, योगेश्वर दांडेकर, अशोक घरडे, अजय खाडे, दिनेश खाडे,राजेश पंत, गणेश श्रीखंडे, मंजुषा भोसे, मीना मुसळे, कल्पना उईके, सीमा गायकवाड, सविता गोहत्रे, सुलोचना घुटे, अश्विनी राठोड, यशस्वी कराडे, राजेश थोराने, रुपेश वानखेडे, सुधीर बेलखेडे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. गुरुप्रसाद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका प्रज्ञा चौधरी व इतर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.