शिक्षक भरतीची जाहिरात या तारखेपासून पवित्र पोर्टलवर

26 Jan 2024 14:22:05
 
advertisement of teacher recruitment on pavitra portal
(image source: internet/representative)  
 
 
पुणे :
शिक्षक भरतीची जाहिरात येत्या २९ जानेवारी रोजी पवित्र पोर्टलवर विहित मुदतीत दिलेल्या जाहिराती एकत्रित पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यानंतर जाहिरातीमधील पात्रतेनुसार उमेदवारांना लवकरच प्राधान्यक्रम भरण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे, असे शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहे.
 
स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवरील जाहिरातविषयक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खासगी शैक्षणिक व्यवस्थापनांना त्यांच्या व्यवस्थापनातील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र पोर्टलवर आरक्षणानुसार विषयनिहाय रिक्त पदे नोंद करून जाहिरात देण्याची सुविधा १५ जानेवारीपर्यंत देण्यात आली होती. यानंतर जास्तीत जास्त रिक्त पदांचा समावेश जाहिरातीत व्हावा, या हेतूने ही मुदत २२ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आली होती. व्यवस्थापनांनी पोर्टलवर नोंदणी करून जाहिरातीतील आरक्षणविषयक माहितीची नोंद करण्याची मुदत आता संपुष्टात आली आहे.
 
Powered By Sangraha 9.0